मुक्तपीठ टीम
प्रेषित मोहम्मद पैगंबरांवर आक्षेपार्ह विधान केल्यानंतर नुपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांची पक्षातून हालपट्टी केली होती. आता भाजपाने हरियाणातील आयटी सेलचे प्रभारी अरुण यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर आणि इस्लामविरोधात वादग्रस्त ट्विट केल्याबद्दल भाजपाने त्यांच्यावर कारवाई केली आहे.
अरुण यादव यांचे काही नवीन आणि काही जुने ट्विट यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. यादव यांनी प्रेषित मोहम्मद पैंगबर आणि इस्लामचा अपमान केल्याचा आरोप झाला. सोशल मीडियावर यादव यांच्या अटकेची मागणी विरोधकांनी ट्विटरवर ट्रेंड केली होती. त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे. हरियाणा भाजपाने प्रसिद्ध पत्रक काढून यादव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केलं आहे.
अरुण यादव आपल्या आक्षेपार्ह ट्वीटसाठी खूप चर्चेत असतात. सोशल मीडियावरही त्याच्या अटकेची मागणी होत होती. त्याचबरोबर अरुण यादव यांना पदावरून हटवण्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अरुण यादव यांच्या अटकेची मागणी करणारे ८५ हजाराहून अधिक ट्वीट करण्यात आले होते. हा एक मोठा मुद्दा बनला आहे.” बहुतेक ट्वीटमध्ये दिल्ली आणि हरियाणा पोलिसांचे हँडल टॅग करण्यात आले होते.