मुंबई मनपाने कंगणानंतर सोनु सुदला सुडाच्या भावनेनं कारवाई केली आहे. सोनू सुदला धडा शिकवण्यासाठी सूड भावनेनं सरकार असं करत असल्याचा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे. ज्या हॉटेलला मनपाने कोरोना संकटात विलगीकरण केंद्र म्हणून वापरले त्याच हॉटेलला आता बेकायदेशीर ठरवणे धक्कादायक असून सोनु सुदसोबत अवघा देश उभा आहे, असंही त्यांनी म्हटले आहे.
पाहा:
अभिनेता सोनू सूद यांनी, कोरोनाच्या संकट काळात आपल्या स्वतःच्या पैशाने गरीब कामगारांना त्यांच्या गावी पाठवण्याचं पुंण्याचं काम केलं. वास्तविक हे काम महाराष्ट्र सरकारचं होतं, महाराष्ट्र सरकारच्या कामाचं अपयश संपूर्ण देशा समोर आलं, त्यामुळे या सरकारला सोनू सूदचं ते काम आवडलं नाही, हे सगळ्यांना ठाऊक आहे. कंगनावर सूडाच्या भावनेतून केलेली कारवाई त्यानंतर, आता सोनू सूदवर हे महाराष्ट्रचं सरकार कारवाई करायला निघालाय. ज्या हॉटेल ला नोटीस दिलि की, अवैध आहे म्हणून तेच हॉटेल या सरकारनं कोरोना संकट काळामध्ये क्वारंटाईन सेन्टर म्हणून त्याचा वापर केला. त्यावेळी सर्व काही व्यवस्थित होतं, पण सूडाचं राजकारण करायचंय, सोनू सूद ला धडा शिकवायचाय म्हणून हे महाराष्ट्राचं सरकार एका प्रतिभाशाली कलावंतावर कारवाई करायला निघालंय, महाराष्ट्र सरकारने एक लक्षात ठेवावं, सोनू सूद सारख्या प्रतिभावंत कलाकारासोबत हा संपूर्ण देश उभा आहे, अशा पद्धतीने तुम्हला सूडाचं राजकारण करता येणार नाही.