Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“गांधी जयंतीनिमित्त भाजपा तर्फे राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन”

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची माहिती

September 30, 2021
in घडलं-बिघडलं
0
madhav bhandari

मुक्तपीठ टीम

महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब पाटील दानवे यांच्यासह पक्षाचे केंद्रीय व प्रदेश पदाधिकारी विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी ही माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींचे विचार सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी खादी प्रसारासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच स्वच्छताविषयक आणि आत्मनिर्भर संकल्पनेच्या प्रसारासाठी विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.

 

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुणे येथील कार्यक्रमांत सहभागी होतील. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत कोथरूड ( पुणे ) येथे स्वच्छतागृहांचे सफाई अभियान, खादी दुकानांना भेट, फिरत्या वाचनालयाचे लोकार्पण असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर येथे, केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी नगर येथे, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे जालना येथे, राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, पंकजा मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ.आशिष शेलार हे मुंबई येथे, राष्ट्रीय सचिव विजयाताई रहाटकर या औरंगाबाद येथे, प्रदेश उपाध्यक्ष संजय कुटे हे शेगाव येथे, सुरेश हाळवणकर हे कोल्हापूर येथे, प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे या नाशिक येथे, आ.सुजितसिंह ठाकूर हे उस्मानाबाद येथे, आ. रवींद्र चव्हाण हे पालघर येथे या कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत. याशिवाय पक्षाचे प्रदेश स्तरावरील अनेक पदाधिकारी, खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधी या कार्यक्रमांत सहभागी होतील, असे भांडारी यांनी पत्रकात नमूद केले आहे.

 

 


Tags: adv. ashish shelarchandrakant patildevendra fadnavismadhav bhandariआशिष शेलारचंद्रकांत पाटीलदेवेंद्र फडणवीसदेवेंद्र फडणवीस. प्रवीण दरेकररावसाहेब पाटील दानवेविनोद तावडे
Previous Post

स्टेमी प्रकल्पामुळे ह्रदय रुग्णांवर पहिल्या तासात उपचार शक्य

Next Post

“जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचे समूळ उच्चाटन करा!”: नाना पटोले

Next Post
Nana Patole

"जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचे समूळ उच्चाटन करा!": नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!