मुक्तपीठ टीम
कोकणातील आलेल्या महापूराच्या आपत्तीनंतर मदतीसाठी अनेक हात पुढे आलेत. लाखो लोक या मदत कार्यात सहभागी होताना दिसले. पण मुंबईतील उत्तर भारतीयांनी कोकणासाठी पाठवलेल्या मदतीला मदत म्हटलेच नाही. भाजपाचे उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा यांच्या शब्दात सांगायचे तर, “रक्षाबंधनाच्या दिवशीचे कोकणासाठीचे हे जे योगदान आहे ते मदतीच्या उद्देशाने नाही तर, ही कोकणातील बहिणींसाठी रक्षाबंधनाची भेट आहे.”
संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे. विविधतेमध्ये एकतेचा मंत्र त्यातूनच जपला जातो. मुंबईतील उत्तर भारतीयांनी पूरग्रस्त कोकणी भगिनींना दिलेले हे योगदान त्याच आपुलकीच्या भावनेतून आहे.
कोकणातील पीडितांना मदत साहित्य
- चिपळूणच्या भिल गावातील 200 कुटुंबांना संपूर्ण स्टीलची भांडी, साड्या, मॅक्सी, टी-शर्ट आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवण्यात आल्या.
- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मालांनी भरलेल्या वाहनांना हिरवा झेंडा दाखवला.
- भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित एका भव्य कार्यक्रमात त्यांनी मदत रवाना केली.
- “मुंबईचा उत्तर भारतीय समाज महाराष्ट्राच्या सुख-दु:खात उभा आहे.” असा संदेश दिल्याबद्दल त्यांनी अमरजीत मिश्रा यांचे कौतुक केले.
- कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडिवरेकर यांनी मिश्रांच्या या भावनेची प्रशंसा केली.
मुंबई भाजप उपाध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री अमरजीत मिश्रा म्हणाले की, “आम्ही मदत साहित्य घेत नाही, तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने आम्ही आमच्या कोकणातील बहिणींसाठी भेटवस्तू घेत आहोत. आम्ही ही भेट कृतज्ञतेने भिल गावातील बहिणींना देऊ इच्छितो.”