मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात सत्ता स्थापन केल्यानंतर आता भाजपाने दक्षिणेकडे आपलं लक्ष्य निश्चित केलं आहे. तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादमध्ये तब्बल १८ वर्षांनी भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक रविवारपर्यंत आहे. तेलंगणासह दक्षिणेतील राज्यांमध्ये भाजपाचं बळ वाढवण्याच्या दृष्टीने या बैठकीत रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे भाजपाचा आक्रमक भूमिका मांडणारी एक बाब या कार्यकारिणीच्या बैठकस्थळी आहे. तेथे महाराष्ट्रात कटू स्मृती असलेल्या निझामाच्या राजवटीतील रझाकारांच्या अत्याचारांची आठवण करून देणारं खास प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.
A Warm Welcome of Shri @Narendramodi ji Prime Minister of India at the airport for attending BJP NEC meeting to be held in Hyderabad at HICC Today & Tomorrow.
श्री नरेंद्र मोदी जी का राष्ट्रीय कार्यकारिणी में आगमन पर भव्य स्वागत। #BJPNECInTelangana pic.twitter.com/P1rO8VZKZV— BJP Telangana (@BJP4Telangana) July 2, 2022
निजामी रझाकारांनाही लक्ष्य केले!
- पक्षाने कार्यकारिणीच्या ठिकाणी मोठे प्रदर्शन आयोजित केले आहे.
- यामध्ये भूतकाळातील निजामाच्या सत्ताकाळातील रझाकारी अत्याचार दाखविण्यात आले आहेत.
- हा निवडणुकीआधी धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न मानला जात आहे.
- याशिवाय वेगळ्या तेलंगणाच्या निर्मितीच्या संघर्षातील भाजपाची भूमिका मांडण्यात आली आहे.
कार्यकारिणीच्या निमित्ताने मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव सरकार लक्ष्य!
- पक्षाचे सरचिटणीस आणि तेलंगणाचे प्रभारी तरुण चुग यांनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) सरकारवर निशाणा साधला.
- संपूर्ण सरकार केसीआर कुटुंबाच्या ताब्यात असल्याचे सांगितले.
- तेलंगणा सरकारचं काऊंट डाऊन सुरू झाली आहे.
- आता फक्त ५२२ दिवस उरले आहेत.
- त्यानंतर बदल निश्चित आहे, असे ते म्हणाले.
Festive atmosphere here at the @BJP4India National Executive Meeting venue – HICC, Hyderabad.
Sharing Glimpses: pic.twitter.com/s7rj5mz6O1— G Kishan Reddy (@kishanreddybjp) July 2, 2022
हैदराबादमधील विविध राज्यांमधील लोकांच्या बैठका
- मुख्यमंत्री राव यांच्या विरोधात निर्माण होत असलेल्या वातावरणाची पूर्तता करण्याची भाजपाची तयारी आहे.
- गेल्या काही वर्षांत भाजपाने आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे.
- कार्यकारिणी बैठकीनिमित्ताने भाजपा हैदराबादमध्ये विविध राज्यांतील १४ समाजांची बैठक घेत आहे.
- यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, आसाम, बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान येथून तेलंगणात राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या लोकांचा समावेश आहे.
- या राज्यांशी संबंधित प्रमुख नेते बैठकांना संबोधित करतील.
Welcomed Hon’ble Union Home Minister & Minister of Cooperation Shri @AmitShah ji at HICC for @BJP4India National Executive Committee Meeting.#BJPNECInTelangana pic.twitter.com/CKmLuZDVGs
— Bandi Sanjay Kumar (@bandisanjay_bjp) July 2, 2022