मुक्तपीठ टीम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या जून महिन्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र राज ठाकरेंनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी, नाही तर अयोध्येत पाय ठेवू देणार नाही अशी अटच उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी ठेवली आहे. राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्या दौऱ्याला जाणार असल्याची घोषणा केली आहे.
काय म्हणाले बृजभूषण शरण सिंह?
उत्तर भारतीयों को अपमानित करने वाले राज ठाकरे को अयोध्या की सीमा में घुसने नहीं दूंगा
अयोध्या आने से पहले सभी उत्तर भारतीयों से हाथ जोड़कर माफ़ी मांगे राज ठाकरे#MNS #RajThackeray #Ayodhya @ANI @ANINewsUP— BrijBhushan Sharan Singh MP (@sharan_mp) May 5, 2022
- बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, राज ठाकरेंनी अयोध्येत येण्याआधी उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागावी.
- आता त्यांना अयोध्येची आठवण येऊ लागली आहे.
- राम मंदिर आंदोलनामध्ये ठाकरे परिवाराचा कोणताही सहभाग नव्हता.
- त्यांचं या आंदोलनाशी काहीही घेणे देणे नाही, राम मंदिर उभारणीमध्ये कोणताही वाटा नाही, अशी टीकाही बृजभूषण सिंह यांनी केली.
- तसेच, योगी आदित्यनाथ यांनी राज ठाकरे यांची भेट नाकारावी. जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना भेट देऊ नये, असा सल्लाही सिंह यांनी मुख्यमंत्री योगीआदित्यनाथ यांना दिला आहे.
बृजभूषण शरण सिंह वादग्रस्त विधानासाठी ओळखले जातात…
जब तक राज ठाकरे सार्वजनिक रूप से उत्तर भारतीयों से माफ़ी नहीं मांग लेते
मेरा आग्रह है तब तक मुख्यमंत्री श्री @myogiadityanath जी को राज ठाकरे से नहीं मिलना चाहिए @CMOfficeUP @BJP4UP @BJP4India @BJP4Maharashtra— BrijBhushan Sharan Singh MP (@sharan_mp) May 5, 2022
- बृजभूषण सिंह हे कैसरगंजचे भाजपचे खासदार आहे.
- बृजभूषण शरण सिंह हे त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत.
- यूपी निवडणुकीदरम्यान त्यांनी हिजाब वादावर मोठे वक्तव्य केले होते.
- ते म्हणाले की, हिजाब ही तालिबानची विचारधारा आहे.
- ही दहशतवाद्यांची विचारसरणी आहे.
- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर भाष्य करताना ते म्हणाले होते की, आज मुस्लिमांकडे ५७ देश आहेत आणि हिंदूंचा एकही देश नाही.
- गांधीजींनी ते होऊ दिले नाही.
- देशाच्या शूर सुपुत्रांची नावे इतिहासाच्या पानातून गायब झाली.