मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाल्याने ते नेहमीच्या कामकाजापासून दूर आहेत. अधिवेशनाआधी त्यांनी विधानभवनालाही भेट दिली. पण अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ते सकाळी आले नसल्याने भाजपाने त्यांच्या अनुपस्थितीलाही मुद्दा बनवले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा चार्ज आदित्य ठाकरेंकडे सोपवावी. योग्य ते सोपस्कार पूर्ण करून रश्मी ठाकरेंनाही देता येईल, असंही त्यांनी सुचवले आहे. त्याचवेळी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी, हे पहिलं चहापान आहे जिथं ज्यांनी आमंत्रण दिलं ते मुख्यमंत्रीच गैरहजर होते,अशी टीका केली आहे. दुसरीकडे आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पाठराखण केली आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य वेळी अधिवेशनात येतील, असे सांगितले.
रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आश्चर्य नाही
- चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे ते गैरहजर असणे स्वाभाविक आहे.
- आमच्या एवढाच आग्रह असा आहे की, परंपरेनुसार तुम्ही कुणाला तरी चार्ज द्यावा.
- त्याची प्रोसेस लांबची आहे.
- त्यासाठी चार्ज राज्यपालांकडे रजिस्टर करावा लागतो.
- तुम्ही राज्यपालांना कितीही मानायचं नाही ठरवलं तरी सुद्धा राज्यपालाशिवाय काहीही करता येत नाही.
मित्र पक्षांवर अविश्वास! आदित्य ठाकरेंकडे द्या!
- त्यांचा अन्य दोन सहकाऱ्यांसोबतचा अविश्वास स्वाभाविकच आहे.
- कारण त्यांनी तो चार्ज घेतला, तर सोडणारच नाहीत.
- त्यांच्या जर पार्टीतही कोणाकडे विश्वास नसेल, तर रश्मी वहिनींना चार्ज देवून त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकतं.
- रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही.
- त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या.
- आदित्य ठाकरेंनाही ते चार्ज देवू शकतात.
- आदित्य ठाकरेंकडे चार्ज दिला पाहिजे.
- मग आदित्य ठाकरेंकडे चार्ज द्यायला त्यांना हरकत काय आहे.
- याबद्दल तुम्हाला काय वाटते, त्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नसेल.
- त्यामुळेच ते त्यांच्याकडे चार्ज देत नाही.
हे पहिलं चहापान आहे जिथं ज्यांनी आमंत्रण दिलं तेच गैर हजर होते : सुधीर मुनगंटीवार
- वीज बिलाची सूट यांनी काढली, कृषी पंपाच्या बाबत देखील चुकीचा निर्णय घेतला यामुळे शेतकऱ्यांचं खासकरून
- मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्यया होतो आहे.
- हे पहिलं चहापान आहे जिथं ज्यांनी आमंत्रण दिलं तेच गैर हजर होते
- हजारो वर्षांपासून चार्ज दुसऱ्याकडे देण्याची पद्दत आहे आता यांनी ठरवलं आहे.
- मीच ठरवेन ते धोरण आणि मीच बांधेन तेच तोरण असं सुरू आहे.
- त्यांनी तत्काळ अजित पवार, आदित्य ठाकरे असोत यांना तत्काळ चार्ज द्यावा आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवायला हवा.