मुक्तपीठ टीम
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक रविवारी सकाळी पोहोचले. मुंबईतील गोरेगाव भागातील पत्रा चाळ प्रकरणी त्यांच्यावर आरोप आहेत. त्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. समन्सला प्रतिसाद न दिल्याने आणि तपासात सहकार्य न केल्याने ईडीचे पथक राऊत यांच्या घरी पोहोचल्याचे कळते. ईडीची चौकशी सुरु असतानाच राऊतांच्या अटकेचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातही भाजपाचे नेते संजय राऊतांना गजाआड जावेच लागेल, असं बजावत आहेत.
राऊतांना मलिकांच्या शेजारी जावेच लागेल! – सोमय्या
- भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, संजय राऊत यांच्या लुटमारीचे आणि माफियांचे पुरावे मी दिले आहेत.
- महाविकास आघाडीचे सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते.
- राज्यातील जनतेला लुटणाऱ्या संजय राऊत यांचा आज हिशोब होणार आहे.
- शिवसेनेच्या खासदाराविरोधात मी पुरावे दिले आहेत.
- माझा विश्वास आहे की राऊत यांनी नवाब मलिकच्या शेजारी जावेच लागेल. आता कारवाई सुरू आहे.
- संजय राऊत पळत होते, आता हिशोब द्यावा लागेल.
कर नाही, तर डर कशाला? – राम कदम
- भाजप आमदार राम कदम म्हणाले की संजय राऊत ईडीची चौकशी का टाळत होते?
- कोणालाही सोडले जाणार नाही. कायदा त्याचे काम करणारच. राऊतांनी ईडीच्या प्रश्नांना आधी उत्तरे द्यायला हवी होती.
- काळ्या-पांढऱ्यावर आलेल्या कागदपत्रांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
- ईडी, सीबीआय कधीच अचानक कारवाई करत नाही.
- त्यापूर्वी कागदपत्रे व इतर चौकशी केली जाते.
- ईडी प्रश्न विचारत असेल तर उत्तरे द्यावीत.
रोज सकाळ खराब करणाऱ्याची सकाळ खराब झाली! – नितेश राणे
- भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले की, जे रोज सकाळी खराब करतात, त्यांची आज सकाळ खराब झाली याचे समाधान आहे. गोरेगावच्या पत्रा चाळीतील जनतेला आता न्याय मिळेल असे दिसते.
- वाकणार नाही वगैरे म्हणणाऱ्यांना आता कळेल.
- भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार याबाबत आपल्याविरुद्ध काहीही होणार नाही, असे त्यांना वाटायचे. पण आता त्यांना कळेल.
- त्यांना शिक्षा व्हायला हवी. तुम्ही कोणीही असाल, भ्रष्टाचाराची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल, असे राणे म्हणाले. चौकशी होईल.
बाहेर पडण्याचा रस्ता शोधला पाहिजे – रावसाहेब दानवे
- संजय राऊतांवरील ईडी कारवाईमागे राजकारण नाही.
- संजय राऊतांविरोधात आरोप आहेत, त्यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे.
- यामागे राजकारण नाही, केलेल्या कृत्यावर पांघरूण घालण्यासाठी भाजपावर आरोप केला जातो.
- संजय राऊतांना आता बाहेर पडण्याचा मार्ग शोधला पाहिजे.
वाचा:
संजय राऊतांच्या घरी ईडी! अटकेची शक्यता!! समजून घ्या नेमकं काय, कसं आणि कधी घडतंय…