मुक्तपीठ टीम
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. नड्डांच्या नव्या टीममध्ये महाराष्ट्रातून सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, चित्रा वाघ आणि हिना गावित यांचा प्रथमच समावेश झाला आहे. एकीकडे काँग्रेसमधून काही महिन्यांपूर्वीच भाजपात आलेल्या नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना कार्यकारिणीत स्थान दिले असतानाच लघु सुक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे यांना मात्र कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे राष्ट्रीय नेतृत्वाला नेमका काय संदेश द्यायचा आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे.
पक्षाविरोधात जाणारे गांधी माता-पुत्र बाहेर!
नव्या कार्यकारिणीत माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि लखीमपूर शेतकरी हत्याकांडासारख्या प्रकरणांमध्ये सरळस्पष्ट भूमिका मांडणारे खासदार वरुण गांधी यांना स्थान देण्यात देण्यात आलेले नाही.
माजी मंत्र्यांना कार्यकारिणीत स्थान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातून वगळलेले प्रकाश जावडेकर, हर्षवर्धन आणि रविशंकर प्रसाद यांना भाजपाच्या कार्यकारिणीत घेण्यात आलं आहे.
शिंदे आहेत, पण राणे नाहीत!
- नाराणय राणे यांना केंद्रात सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रीपद देण्यात आले आहे.
- त्यामुळे स्वाभाविकच भाजपाच्या या कार्यकारिणीत त्यांचा समावेश, अपेक्षित मानला जात होता.
- मात्र, नारायण राणेंना कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेलं नाही.
- त्याचवेळी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. राणे यांच्याप्रमाणेच त्यांच्याकडेही केंद्रीय मंत्रीपद आहे.
सत्तेनंतरची मुनगंटीवार, शेलारांची सक्रियता फळली
- राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल हे दोन केंद्रीय मंत्री, प्रकाश जावडेकर, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, चित्रा वाघ यांचा समावेश करण्यात आला आहे.
- राष्ट्रीय सचिव म्हणून महाराष्ट्रातून विनोद तावडे, सुनील देवधर, पंकजा मुंडे यांचा समावेश कायम ठेवण्यात आला आहे.
- विशेष निमंत्रितांमध्ये सुधीर मुनंगटीवार, आशिष शेलार, लड्डाराम नागवाणी हे नेते आहेत.
- राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून सुनील वर्मा, हिना गावित यांची निवड करण्यात आली आहे.
- माजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश करण्यात आला आहे.
- चंद्रकांत पाटील यांना कायम ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून सीटी रवी, ओमप्रकाश धुर्वे, जयभान सिंग पवैय्या यांची नियुक्ती कायम आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्र
- नितीन गडकरी
- पीयूष गोयल
- प्रकाश जावडेकर
- डॉ. विनय सहस्त्रबुद्धे
- चित्रा वाघ
राष्ट्रीय सचिव
- विनोद तावडे
- सुनील देवधर
- पंकजा मुंडे
विशेष निमंत्रित
- सुधीर मुनंगटीवार
- आशिष शेलार
- लड्डाराम नागवाणीं
राष्ट्रीय प्रवक्ते
- सुनील वर्मा
- हिना गावित
माजी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
राज्य प्रदेशाध्यक्ष
चंद्रकांत पाटील
महाराष्ट्राचे प्रभारी
- सीटी रवी,
- ओमप्रकाश धुर्वे
- जयभान सिंग पवैय्या