मुक्तपीठ टीम
अंधेरी पोटनिवडणूकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटकेंचा राजीनामा स्वीकारल्यानंतर या निवडणुकीत शिंदे गट लढवणार की भाजपा असा अशी चर्चा रंगू लागली होती. भाजपाकडून मुरजी पटेलांचं नाव आघाडीवर होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून शिंदे गटाकडून उमेदवार उतरवण्याचे संकेत दिले जात होते. मात्र आता मुरजी पटेल यांना भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल हा सामना होणार आहे.
मुरजी पटेल कमळ या चिन्हावर निवडणूक लढवणार!!
- अंधेरी मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने या जागेवर शिंदे गटाकडू दावा केला जात होता.
- त्यामुळे मुरजी पटेल नेमकं कुणाच्या चिन्हावर निवडणूक लढणार याबद्दल संभ्रम होता.
- मात्र गुरुवारी संध्याकाळी वर्षा या निवासस्थानी भाजपा नेते आशिष शेलार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली.
- त्यामध्ये ही जागा भाजपाला सोडण्यावर दोन्ही बाजूने एकमत झालं.
- त्यानंतर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुरजी पटेल यांना कॉल करून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या सूचना दिल्या.
मुरजी पटेलांसाठी भाजपाच्या मोठ्या नेत्यांचा प्रचार
- अंधेरी पूर्व मतदारसंघात शिंदे गटापेक्षा भाजपची मोठी ताकत असल्याने या जागेसाठी भाजपा आग्रही होता.
- त्यांचा उमेदवारही ठरला होता.
- मुरजी पटेल यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली होती.
- पण शिंदे गटाकडूनही या जागेवर दावा करण्यात येत होता.
- शिंदे गटाच्या ढाल तलवार या चिन्हावर मुरजी पटेल यांनी निवडणूक लढवावी असाही एक मतप्रवाह निर्माण झाला होता.
- त्यानंतर आज ही जागा भाजपाच लढवेल यावर एकमत झालं.
- त्यामुळे मुरजी पटेल यांनी आज आपल्या उमेदवारीचा अर्ज भरायला निघाले आहेत.
- मुरजी पटेलांसाठी भाजपा नेते आशिष शेलार, निलेश राणे आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते दिपक केसरकर प्रसाचारासाठी आले आहेत.