मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात चर्चोला उधाण आले असून आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. या मागणीला काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे.
यात भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी, हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी पदाचा राजीनामा न दिल्यास रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला आहे.
भाजपच्या या टीकेला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी, हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य या भाजप महिला आघाडीच्या मागणीनंतर भाजपामधील नेते टेन्शनमध्ये आले असतील, असे खोचक प्रत्युत्तर दिले आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या बलात्काराच्या आरोपावर महाविकासआघाडीने अद्याप आपली अधिकृत भूमिका मांडली नाही. त्यामुळे याप्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री काय भूमिका घेणार हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.