मुक्तपीठ टीम
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हेच मुख्य सूत्रधार आहेत. तसेच मुनसुख हिरेनची हत्या करणाऱ्यासाठी सचिन वाझे यांनी शर्मांना ४५ लाख रुपये दिल्याचे एनआयएने स्पष्ट केले आहे. यानंतर एकच खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “सचिन वाझे काही लादेन आहे का?” या प्रकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारल्याची आठवण करून देत त्यांनी ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
वाझे आणि शर्मा दोन्ही शिवसेनेत होते…
- प्रदीप शर्मा हे सुद्धा सचिन वाझेप्रमाणे शिवसेनेत होते.
- जसे वाझे शिवसेनेचा प्रवक्ता होता तसे शर्मा शिवसेनेत होते.
- त्यांनी आता शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती.
- शिवसेनेच्या नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.
- त्यामुळे शिवसेनेशी संबंधित असणारे दोन अधिकारी हे एकाचे खून करण्याची सुपारी देतो, दुसरा सुपारी घेतो हे खरोखर धक्कादायक आहे.
- एका सामान्य पोलीस अधिकाऱ्याकडे ४५ लाख येतात कुठून हा सुद्धा प्रश्न आहे.
- तसेच हे दोघे पोलीस अधिकारी कुणाच्या इशाऱ्यावर गंभीर कृत्ये करत होते हेही समोर आलं पाहिजे.
- बाकी प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राचा अपमान शोधणाऱ्या शिवसेनेच्या बोलघेवड्या नेत्यांनी शिवसेनेशी संबंध असलेल्या या पोलीस अधिकाऱ्यांच्या कृतीने पोलीस खात्याचा आणि राज्याचा सन्मान वाढला का, याचं उत्तर द्यावं,
काय म्हणाले केशव उपाध्ये?
- सचिन वाझे काही लादेन आहे का?
- वाझेची विधीमंडळात पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट उत्तर दिलं पाहिजे.
- वाझेची पाठराखण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे.
- हे लागेबंध कोणाचे आहेत ते समोर आले पाहिजे.
- त्यामुळे भाजपाची मागणी आहे, की वाझे आणि शर्मासंबंधित प्रकरणाचा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे आणि महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे.
‘#सचिन_वाजे_काही_लादेन_आहे_का?’
“सचिन वाझे काही लादेन आहे का?” असा सवाल करत वाझेची विधीमंडळात पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट उत्तर दिल पाहिजे.
मनसुख हिरेन यांची हत्या माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी केल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या 1/4— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 5, 2022
पाहा: