मुक्तपीठ टीम
जिथे जिथे राज्य सरकारच्या मंत्र्यांवर भष्ट्राचाराचा आरोप लावला जात आहे, तिथे तिथे कलेक्शन एजंट म्हणून कोण काम करतं, अशी विचारणा सचिन वाझेंचं नाव घेऊन केलीच जाते. ताजं प्रकरण हे मुंबई मनपाचं आहे. भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांनी मुंबई मनपा आयुक्त इकबाल चहल यांना पत्र लिहिलं आहे. “१२९ कोटींचं काम ५०० कोटींवर नेऊन ठेवणारा मनपातील‘सचिन वाझे’ कोण?” असा सवाल त्यांनी या पत्रातून केला आहे.
राहुल नार्वेकरांच्या पत्रात नेमकं काय?
- मनपातील ‘सचिन वाझे’ कोण? आहे.
- निविदा काढताना १२९ कोटींची मात्र वाढीव काम दाखवत खर्च नेला ५०० कोटींवर गेला.
- खर्च वाढल्यास इतर कामांच्या निविदा न काढता रकमेतील निधींची फेरफार केली का?
- हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असून यात भ्रष्टाचार झाल्याचं स्पष्ट होत आहे.
- जनतेच्या पैशांचा चुराडा होत असताना पाहत राहणारी मुंबईकर जनता एवढी दुधखुळी नाही.
- संबंधित प्रकरणाची चौकशी करा आणि जो कोणी पालिकेतील ‘सचिन वाझे’ आहे, त्याच्यावर कारवाई करा.
याआधी सचिन वाझेंची आणखी कधी?
- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी सचिन वाझे हा सहाय्यक निरीक्षक कलेक्शन एजंट म्हणून काम करत होता, असा आरोप माजी आयुक्त परमबिर सिंह यांनी केला होता.
- परमबिरांच्या त्या आरोपामुळे भाजपाला आघाडी सरकारविरोधात लढण्यासाठी मुद्दा मिळाला.
- त्या आरोपानंतर स्वत: परमबिरही आरोपाच्या भोवऱ्यात सापडले. फिर्यादीचे आरोपी झाले. पण भाजपाने वाझे शब्द परवलीचा बनवला.
- आघाडीसरकारविरोधात हल्लाबोल करताना त्या प्रकरणातील ‘वाझे’ कोण? असा सवाल नक्कीच केला जातो.
- मनपाच्या अग्निशमन विभागात पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाने केला होता.
- त्या प्रकरणात अग्निशमन दलाचा ‘वाझे’ कोण? असा सवाल भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला होता.
- अभिनेता दिनो मोरिया याच्यावर ईडी कारवाईनंतर आमदार नितेश राणे शिवसेनेविरोधात आक्रमक झाले होते.
- दिनो मोरिया हा मुंबई मनपातील सचिन वाझे होता, असा आरोप नितेश राणे यांनी केला होता.