Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपावर बंजारा समाजाच्या पोहरादेवीचे महत्व नष्ट करण्याच्या प्रयत्नांचा आरोप

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Pohra Devi

मुक्तपीठ टीम

भाजपा व संघाकडून बंजारा समाजाची पर्यायी काशी निर्माण करण्याचे षडयंत्र रचले गेले आहेत. भाजपाने जळगाव जिल्हयातील गोद्री येथे बंजारा समाज महाकुंभ मेळाव्याचे आयोजन केले आहे. या महाकुंभाच्या माध्यमातून भाजपा तसेच संघ परीवार बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीची ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. या षडयंत्राविरुध्द बंजारा समाज बांधवांनी एकत्रित होऊन भाजपाचा कपटी डाव हाणून पाडावा यासाठी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पोहरादेवी येथे आयोजित या सभेला बंजारा बांधवांनी उपस्थित रहावे आणि आपले स्पष्ट मत व्यक्त करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते देवानंद पवार यांनी केले आहे.

भाजपा तसेच संघ परीवार बंजारा समाजाची हिंदु सनातन गोर बंजारा अशी नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. पुरोगामी विचाराच्या बंजारा समाजाची सनातनी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न मान्य नसल्याचे देवानंद पवार यांनी म्हटले आहे. राजकीय स्वार्थासाठी पोहरादेवीची ओळख नष्ट करण्याचे पाप भाजपाने करु नये असे स्पष्ट केले असतांनाही भाजपा आपल्या निर्णयापासून मागे हटायला तयार नाही. त्यामुळे बंजारा समाजात संताप व्यक्त केला जात आहे. या गंभीर विषयावर समाजातील नागरीकांना माहिती देण्यासाठी तसेच त्यांच्याही भावना समजून घेण्यासाठी रविवार दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १ वाजता पोहरादेवी येथील भक्तीधाम येथे सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा संत श्री. सेवालाल महाराज सेवा समिती, महाराष्ट्रने आयोजित केली आहे. या सभेत पोहरादेवीचे महंत, समाजाचे प्रमुख नेते व प्रतिष्ठीत सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या सभेत राज्यातील बंजारा समाजाच्या विविध सामाजिक संघटना, अधिकारी-कर्मचारी संघटना तसेच समाज बांधवांनी उपस्थित राहून आपले मत व्यक्त करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते देवानंद पवार यांनी केले आहे.

भाजपाचे षडयंत्र हाणून पाडणार..

पुरोगामी बंजारा समाजाला सनातनी बनविण्याचे भाजपाचे षडयंत्र आम्ही पुर्ण होऊ देणार नाही. मागासलेला असला तरी बंजारा समाज सामाजिक सुधारणांच्या बाबतीत सतत अग्रेसर राहीला आहे. भाजपाची निती समाजात तेढ निर्माण करणारी आहे. आम्ही त्यांचे मनसुबे पुर्ण होऊ देणार नाही. त्यामुळेच समाजात जागृकता निर्माण करण्याचे आम्ही प्रयत्न सुरु केले असल्याचे देवानंद पवार यांनी म्हटले आहे.

 


Tags: Banjara CommunityBJPPohra Deviबंजारा समाजभाजपा
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन 

Next Post

जी २० परिषद : सर्वपक्षीय बैठकीस गैरहजर राहून उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राचा अपमान

Next Post
Bawankule And uddhav thackeray

जी २० परिषद : सर्वपक्षीय बैठकीस गैरहजर राहून उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राचा अपमान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!