मुक्तपीठ टीम
मनात विष असेल आणि मुखी दाखवण्यापुरते अमृत असेल तर कधी ना कधी ते उघड होतंच आणि मग जग तसंच वागवतं. पाकिस्तानला सध्या तसाच अनुभव येत आहे. पाकिस्तानने चौसा आंब्याची गोड भेट पाठवून जगभरातील ३२ छोट्या-मोठ्या देशांशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. मात्र, अमेरिकाच नाही तर मित्र देश चीननेही आणि मोठ्याच नाही तर नेपाळसारख्या छोट्या देशांनीही कोरोना नियमांचं कारण देत कडू नकार दिला.
पाकिस्तानची मँगो डिप्लोमसी ठरली कडवटपणाची…
- जगभरातील ३२ देशांना खूश करण्यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न
- पाकिस्तानने एकूण ३२ देशांना आंबे भेटवस्तू म्हणून पाठवले.
- मात्र अमेरिकेने आणि पाकिस्तानचा मित्र समजल्या जाणाऱ्या चीननं आंब्यांची भेट नाकारली आहे.
- कोरोनासंबंधित नियमांचं कारण देत स्विकारण्यास मनाई केली आहे.
- या आंबाच्या पेट्या चीन आणि अमेरिकेसह कॅनडा, नेपाळ आणि श्रीलंकेने स्विकारण्यास नकार दिला.
पाकिस्तानी माध्यमांमधील माहितीनुसार, पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिष अल्वी यांनी ३२ प्रमुख देशांना चौंसा जातीचे आंबे भेट म्हणून पाठवले होते. या आंब्याच्या पेट्या इराण, तुर्कस्तान, ब्रिटन, अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि रशियाला पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, अनेक देशांनी त्या स्वीकारण्यास नकार दिल्याने एक प्रकारे पाकिस्तानचा अपमान झाल्याचे मानले जाते.