Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आरेवाडीच्या बिरोबा देवस्थान विकासकामांना निधी मिळणार

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

January 20, 2021
in सरकारी बातम्या
0
ajit pawar

मुक्तपीठ टीम

 

सांगली जिल्ह्याच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा देवस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून या देवस्थानला दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येत असतात. आरेवाडी देवस्थानाला भेट देणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी बिरोबा देवस्थान विकास आराखड्यातील सर्व कामे दर्जेदार पद्धतीनं करण्यात यावीत. विकासकामांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करण्यात येऊ नये. या कामांसाठी लागणारा निधी आवश्यकतेनुसार उपलब्ध करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात बिरोबा देवस्थान विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला गती देण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे निर्देश दिले.

 

सांगली जिल्ह्यातील आरेवाडीचे बिरोबा देवस्थान ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्र आहे. तिर्थक्षेत्र विकासांतर्गत देवस्थान आणि परिसराचा विकास करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यांतर्गत अंतर्गत रस्ते, वाहनतळ, स्ट्रीटलाईट, भक्त निवास व स्वच्छतागृह, सांडपाणी व्यवस्थापन, दुकानगाळ्यांचे बांधकाम आदी विकासकामे सुरु आहेत. ही सर्व बांधकामे दर्जेदार असली पाहिजेत. मंदीर व देवस्थान परिसराचे सुशोभिकरण करताना परिसरात मोठ्या प्रमाणावर स्थानिक देशी झाडांची लागवड करण्यात यावी. त्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाची मदत घ्यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी परिसराला भेट देऊन स्वत: विकासकामांचा आढावा घ्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या बैठकीत दिल्या. उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर आरेवाडीच्या बिरोबा देवस्थान विकासाची प्रक्रिया गतीमान होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

 

बैठकीला राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, पर्यटन राज्यमंत्री अदितीताई तटकरे, आमदार सुमनताई पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार विक्रम सावंत, बिरोबा देवस्थान ट्रस्टचे राहूल कोळेकर, जगन्नाथ कोळेकर, दाजी कोळेकर आदी मान्यवरांसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Tags: aarevadiajit pawardevelopmentEnvironment Minister Aditya Thackeraysangliअजित पवारआदित्य ठाकरेआरेवाडीउपमुख्यमंत्रीपर्यटनमंत्रीपर्यटनमंत्री आदित्य ठाकरेसांगली
Previous Post

भंडारा आगीमागे शॉटसर्किट आणि मानवी हलगर्जीपणा! वरिष्ठही दोषी!!

Next Post

अर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करा! : सचिन सावंत.

Next Post
sachin sawant

अर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करा! : सचिन सावंत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!