मुक्तपीठ टीम
टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूचं अवघं जीवनच स्फुर्तिदायी असं. गेली काही वर्षे आपल्या बॉलिवूडमध्ये रिअल लाइफ हिरोंवरील चित्रपट बनत आहेत. तसंच चित्रपट रसिकांची बॉक्स ऑफिसवर दाद मिळत आहे. त्यामुळेच मीराबाईच्या जीवनावर चित्रपट येण्याची अपेक्षा होतीच. आता मीराबाईनं एका प्रोडक्शन हाऊसशी करार केल्यानंतर तिच्या जीवनाला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार, हे निश्चित मानलं जात आहे.
मीराबाईमुळे पहिल्यांदा फडकला भारताचा तिरंगा!
- २३ जुलैपासून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धोत्सव सुरू झाला आहे.
- मीराबाई चानू या भारतासाठी या ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडू आहेत.
- भारतीय महिला लिफ्टर मीराबाईने ४९ किलो वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.
- ऑलिंपिक इतिहासात वेटलिफ्टिंगमध्ये भारताचे हे दुसरे ऑलिंपिक पदक आहे.
मीराबाईवर बायोपिक!
- मीराबाईच्या जीवनाला केंद्रस्थानी ठेवून एक चित्रपट बनवला जाणार आहे.
- मीराबाईच्या जीवनावर मणिपुरी चित्रपट बनवला जाईल.
- या संदर्भात मीराबाई आणि इंफाळच्या सेउटी फिल्म्स प्रॉडक्शन्स यांच्यात नुकताच करार झाला आहे.
- हा चित्रपट इंग्रजी आणि विविध भारतीय भाषांमध्ये डब केला जाईल.