मुक्तपीठ टीम
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी वेगळे होणाचा निर्णय घेत घटस्फोट घेतला आहे. पण वेगळे झाल्यानंतरही या दोघांमध्ये एक दुवा असेल जो त्यांना जोडून ठेवणार आहे. तो दुवा म्हणजे बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशन. या फाउंडेशनसाठी एकत्र काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सर्वात महत्वाची बाब अशी की गेट्स दाम्पत्याने त्यांच्या संपत्तीपैकी ९५ टक्के संपत्ती याच फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजसेवेसाठी खर्च करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे त्यांच्या मुलांनाही फक्त ५ टक्केच संपत्ती मिळणार आहेत.
बिल आणि मेलिंडा यांच्या निवेदनात काय?
• बिल आणि मेलिंडा यांनी संयुक्त निवेदन जारी केले आहे
• आमच्या नात्याबद्दल बराच विचार केला, ते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला.
• पण विचारअंती आम्ही आमचे नाते संपविण्याचा निर्णय घेतला आहे.
• मागील २७ वर्षांच्या प्रवासात आम्ही ३ मुलांना वाढवले.
• जगभरातील लोकांना एक आरोग्यदायी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मदत करणारी संस्था स्थापन केली.
• आम्ही घटस्फोट घेतल्यानंतही या संस्थेसाठी एकत्र काम सुरुच ठेवणार आहोत.
— Bill Gates (@BillGates) May 3, 2021
बिल आणि मेलिंडा कसे भेटले होते…
• सन १९८७ मध्ये मेलिंडाने मायक्रोसॉफ्ट कंपनीत प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम करण्यास सुरुवात केली असून तेव्हाच त्या दोघांची ओळख झाली होती.
• बिल गेट्स मेलिंडा यांना पाहाताच प्रेमात पडले होते.
• त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
• सन १९९४ मध्ये बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी हवाई येथे लग्न केले होते.
• या दोघांनी २००० मध्ये बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशनची स्थापन केली होती.
View this post on Instagram
मुलांना मिळणार फक्त ५ टक्के संपत्ती!
• बिल गेट्स यांची सध्याची संपत्ती १६ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे ११ लाख कोटी रुपये आहे. बिल गेट्स यांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे, त्यांच्या प्रत्येक मुलाला त्यांच्या संपत्तीमधून सुमारे ७३ कोटी रुपये दिले जातील.
• तिन्ही मुलांना एकूण ३० दशलक्ष डॉलर्सची संपत्ती दिली जाईल.
• बिल आणि मिलिंडा गेट्स यांच्या एकूण संपत्तीपैकी ९५% संपत्ती समाजसेवेसाठी दान केली जाईल.
• यासाठी दोघांनी बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशनची स्थापना केली आहे.