मुक्तपीठ टीम
आज ५८० वर्षांनंतर सर्वात जास्त काळ चालणारं आंशिक चंद्रग्रहण भारतातील फक्त इंफाळमध्येच दिसणार आहे. हे ग्रहण या वर्षातील शेवटचे मोठे चंद्रग्रहण असेल. एकूण ग्रहण सहा तास दोन मिनिटांचे असेल. चंद्राचा ९८ टक्के भाग ग्रहणात राहील.
भारतात दिवस सुरू असल्याने हे ग्रहण देशातील बहुतांश भागात दिसणार नाही. हे ग्रहण मणिपूरची राजधानी, इंफाळ आणि त्याच्या सीमावर्ती भागात संध्याकाळी चंद्रावर पातळ रेषेच्या स्वरूपात काही मिनिटांसाठी पाहता येईल.
चंद्र ग्रहणाविषयीची महत्त्वाची माहिती
- भारतीय वेळेनुसार उपछाया असणारे ग्रहण रात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी सुरू होईल.
- अस्पष्ट आंशिक ग्रहण दुपारी १२ वाजून ४९ मिनिटांनी सुरू होईल.
- ग्रहणात चंद्राचा ९८ टक्के भाग कक्षेत असेल.
- त्यानंतर ग्रहण ओसरू लागेल.
- संध्याकाळी ४ वाजून १७ मिनिटांनी चंद्र ग्रहणापासून मुक्त होईल.
- यानंतर ५ वाजून ३४ मिनिटांनी ग्रहण समाप्त होईल.
- उपछाया ग्रहणाची सावली इतकी बारीक असते की ती दिसू शकत नाही.
- भारतातील ग्रहण एक तास सात मिनिटे चालेल.
चंद्र आणि पृथ्वीमधील अंतरामुळे ग्रहण लहान-मोठे असतात
- हे दीर्घकालीन ग्रहण ५८० वर्षांनंतर होणार आहे.
- चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर जास्त असल्याने हे ग्रहण दीर्घ कालावधीचे असणार आहे. पृथ्वीपासूनच्या अंतरामुळे चंद्राचा वेगही खूप कमी असेल.
- ग्रहण ही एक सामान्य खगोलीय घटना आहे.
जगातील बहुतांश भागात ग्रहण दिसणार
- आंशिक चंद्रग्रहण जगातील बहुतांश भागात दिसणार आहे.
- ज्यामध्ये हे ग्रहण युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, प्रशांत महासागर, अंटार्क्टिक महासागर आणि हिंदी महासागर क्षेत्रात दिसणार आहे.
- १५ दिवसांनंतर ४ डिसेंबरला सूर्यग्रहण होणार आहे.
- यावर्षी हा दिवस खास असणार आहे.
- या दिवशी आंशिक चंद्रग्रहणाव्यतिरिक्त कार्तिक पौर्णिमा असेल.
- याशिवाय प्रकाशोत्सवही या दिवशीच होणार आहे. त्यामुळे हा दिवस विशेष मानला जातो.