बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी बालपणी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना सापाला मारल्या प्रकरणी खोटं कारण दिलं होतं आणि या कारणासाठी त्यांना शिक्षा म्हणून हातावर ६ छड्या मारण्यात आल्या होत्या. बिग बी यांनी नुकत्याच झालेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ च्या कर्मवीर स्पेशल एपिसोडमध्ये या गोष्टीबाबत सांगितले. या कर्मवीर स्पेशल एपिसोडला खास पाहुणे म्हणून बोमन इराणी उपस्थित होते. बोमन इराणी यांनी अमिताभ यांना शालेय जीवनाबद्दल विचारले असता अमिताभ बच्चन यांनी अनेक बालवयातील शाळेत केलेले गौप्यस्फोट ‘कौन बनेगा करोडपती’ च्या मंचावर केले. अमिताभ म्हणाले, “मी लहाणपणी खूप भीत्रा होतो. आम्ही खूप गोष्टी लपुन छपुन करायचो आणि कधीच कोणालाही कळू ही द्यायचो नाही.
“बिग बींनी सांगितले की, एकदा ते त्याच्या मित्रांसोबत होते, तेव्हा त्याला एक साप दिसला आणि ते त्या सापाला बघून घाबरून पळून गेले. त्यानंतर त्यांना रस्त्याच्या कडेला एक शिकारी दिसला त्याच्या मदतीने त्यांनी त्या सापाला मारले. त्यावर अमिताभ बच्चन सांगतात की, जेव्हा सापाला मारले तेव्हा त्याला वाटले की ही एक मोठी गोष्ट आहे. म्हणून त्यांनी एक हॉकी स्टिक घेऊन त्यावर त्या मृत सपाला त्यावर गुंडाळले आणि शाळेच्या आवारात आणून फिरवून दाखवले. हे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी आम्हांला याबद्दल विचारले.
बिग बी म्हणतात, “आमचे मुख्याध्यापक हे ब्रिटिश होते, त्यामुळे त्यांना सत्य जाणून घेणं खूप महत्वाचे होते. त्यांनी या बाबत आम्हांला विचारले, तुम्हांला माहित आहे का तुम्ही चूक केलेली आहात यावर आम्ही म्हणालो की, होय सर. मग मुख्याध्यापकांनी शिक्षा म्हणून आम्हांला हातावर ६ छड्या मारल्या. या मंचावर अमिताभ बच्चन यांनी विद्यार्थ्यांना शाळेत होणाऱ्या शिक्षेबद्दलही सांगितले. त्यांच्या मते, शाळा हे एक गॅरेज आहे ज्यामध्ये वेताच्या काठ्या ठेवलेल्या असतात. मुख्याध्यापकांनी त्यांना आणि त्याच्या मित्रांला वाकायला सांगितले आणि पाठीवर वेताच्या काठ्यांनी त्यांना मारले होते. त्यावर बिग बी म्हणतात, खूप वेदना झालेल्या परंतु तरीही आम्हांला सरांना थॅंक्यु बोलावे लागत होते.