Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बंगालमध्ये पुन्हा भाजपाचा धुव्वा…ममता बॅनर्जीचा दणदणीत विजय!

घरच्या भवानीपूरमधून विजयाची हॅटट्रिक!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Mamata Banerjee Victory sign 3-10-21

मुक्तपीठ टीम

बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या रणरागिनी ममता बॅनर्जी यांचा विजय झाला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममध्ये भाजप उमेदवार शुभेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर विधानसभा मतदारसंघात ५८ हजार ८३२ एवढ्या विक्रमी मताधि्क्याने विजय मिळवला आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या उमेदवार प्रियंका तिब्रेवाल यांचा सपशेल पराभव केला. या मतदारसंघातील विजयामुळे ममता बॅनर्जीची भवानीपूरमधून हॅटट्रिक झाली आहे.

ममता बॅनर्जी गेल्या दोन निवडणुका त्यांच्या घरच्या भवानीपूर मतदारसंघामधून जिंकत होत्या. पण विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढवली होती. त्यांच्या पक्षातून फुटून भाजपात गेलेल्या शुभेंदू अधिकारी यांनी त्यांना आपल्या बालेकिल्ल्यात पराभूत केले होते. पण त्याच विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने भाजपला चिरडले. ममतांच्या पक्षाने २२३ जागा जिंकल्या आणि ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या.

भाजपच्या प्रियंका टिबरेवाल आणि माकपचे जीब बिस्वास यांना खूपच कमी मतं मिळाली आहेत. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर मतदारसंघात भाजपाच्या प्रियांका टिबरेवाल आणि माकपकडून जीब बिस्वास यांच्याशी सामना आहे. मे महिन्यात झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत झाल्या. त्यामुळे मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी त्यांना या जागेवरून जिंकणे आवश्यक आहे. सहा महिन्यांच्या आत विधानसभेचे सदस्य होणे त्यांच्यासाठी अनिवार्य होते. आजच्या दणदणीत विजयामुळे आता त्या कसल्याही बाधेविना कार्यरत राहू शकतात.

 


Tags: BJPCongressMamata BanerjeePriyanka Tibdewalकाँग्रेसप्रियंका टिबरेवालभाजपममता बॅनर्जी
Previous Post

आलिशान क्रुझवर ड्रग पार्टीचा हैदोस! बॉलिवूड, ड्रग आणि धोका!

Next Post

किल्लारी भूकंपाच्या २८वर्षानंतर सुद्धा “आपत्ती व्यवस्थापना”बद्दल आपण काहीच शिकलो नाही!

Next Post
killari

किल्लारी भूकंपाच्या २८वर्षानंतर सुद्धा "आपत्ती व्यवस्थापना"बद्दल आपण काहीच शिकलो नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!