Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिंदे गटातील आमदाराला नको भाजपाशी युती, निशाणी ‘कुत्रा’ असली तरी जिंकण्याचा दावा!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Abdul Sattar (2)

मुक्तपीठ टीम

एकीकडे शिंदे गट भाजपासोबत युती करून महाराष्ट्रात सरकार चालवत आहे, तर दुसरीकडे मात्र त्यांच्या गटातल्या मंत्र्यांच्या विधानांमुळे शिंदे-फडणवीस सरकारवर अडचणीत येत आहे. शिंदे गटातील आमदारांची नाराजी आता लपून राहिलेली नाही. शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिंदे गट आणि भाजपा युतीबाबत तसेच निवडणूक चिन्हावर खळबळजनक वक्तव्य केलं आहे. अब्दुल सत्तार यांनी “माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको,” असं मोठं विधान केलं आहे. तसेच “मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईन,” असेही अब्दुल सत्तार म्हणाले. अब्दुल सत्तारांच्या या विधानांनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको…

  • अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
  • माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको.
  • या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत व्हावी.
  • माझ्याच नाही, तर ज्या ज्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघाप्रमाणे परिस्थिती असेल त्या त्या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती करण्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी विचार करावा.
  • शेवटी निवडून आल्यावर सत्ता स्थापन करताना आपण सोबत राहू.
  • दिल्लीत आणि मुंबईतसह जिल्ह्यात, महापालिकेत, जिल्हा परिषदेत सोबत राहू.
  • स्थानिक पातळीवर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपा असे दोघेच आहोत.
  • त्यामुळे या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे.
  • जो निवडून येईल तो सत्ताधाऱ्यांचा म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाच कार्यकर्ता असेल.

मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईन!!

  • मी एकनाथ शिंदेंना सांगितलं की मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईन.
  • कमकुवत माणसाला काहीतरी आधार लागतो.
  • मी कार्यकर्ता आहे आणि जो कार्यकर्ता असतो त्याला कधीही कोणत्याही गोष्टीची भीतीच वाटत नाही.
  • कार्यकर्ता पद कुणी हिसकावूनही घेऊ शकत नाही.
  • आमदार, खासदार, मंत्रीपद निघून जाईल, आणखी काही पदं असतील ती जातील, पण कार्यकर्ता हे पद कधीही जात नाही.

Tags: BJPMaharashtraMinister Abdul SattarShinde CampShivsenaअब्दुल सत्तारनिवडणूक चिन्हभाजपामहाराष्ट्रशिंदे गटशिवसेना
Previous Post

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात ‘हेड कॉन्स्टेबल’ पदावर २३ जागांसाठी संधी

Next Post

असुरक्षित गर्भपात स्त्रीच्या आरोग्यास धोकादायक! जाणून घ्या घातक दुष्परिणाम…

Next Post
Unsafe Abortion

असुरक्षित गर्भपात स्त्रीच्या आरोग्यास धोकादायक! जाणून घ्या घातक दुष्परिणाम...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!