Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय क्रिकेट मोठ्या बदलांच्या उंबरठ्यावर?

प्रिशिक्षक रवी शास्त्री होऊ शकतात पदमुक्त

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ravi shastri

मुक्तपीठ टीम

यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी२० वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री, बॉलिंग कोच भरत अरुण, फील्डिंग कोच आर. श्रीधर आणि बॅटिंग कोच विक्रम राठोड टीम इंडियापासून विभक्त होऊ शकतात. ४ वर्षात एकदाही ICC पुरस्कार न जिंकणं हे या मोठ्या निर्णयामागचं कारण असू शकतं. तसंच नोव्हेंबरमध्ये शास्त्रींसह संपूर्ण कोटिंग स्टाफचा कार्यकाळही संपतो आहे. तसंच इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार BCCI टी२० वर्ल्ड कपनंतर नवीन कोचिंग स्टाफ नियुक्त करु इच्छित आहे, जेणेकरुन टीम इंडियाला नव्या उंचीवर नेलं जाऊ शकेल.

 

टी२० वर्ल्ड कपनंतर शास्त्रींचा संपतोय कॉन्ट्रॅक्ट

  • रवी शास्त्री पहिल्यांदा २०१४ मध्ये डायरेक्टर म्हणून टीम इंडियासोबत जोडले गेले.
  • त्यांचा कॉन्ट्रॅक्ट २०१६ पर्यंत होता.
  • यानंतर शास्त्रींना वर्षभरासाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं गेलं.
  • २०१७ मध्ये अनिल कुंबळेंनतर ते टीम इंडियाचे पूर्णवेळ प्रशिक्षक बनले.
  • त्यावेळी शास्त्रींचा कार्यकाळ २०१९ च्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत होता.
  • २०१९ मधल्या चांगल्या कामगिरीनंतर शास्त्रींचा कॉन्ट्रॅक्ट २०२० टी२० कपपर्यंत वाढवला गेला.
  • गेल्या वर्षी कोरोनामुळे टी२० वर्ल्ड कप होऊ शकला नाही. मात्र यावर्षीच्या टी २० नंतर शास्त्रींचा कार्यकाळ संपणार आहे.
  • शास्त्रींनंतर एनसीएचे डायरेक्ट राहुल द्रविड टीम इंडियाचे प्रशिक्षक बनू शकतात.

 

शास्त्रींच्या ट्रेनिंगमधील टीम इंडियाचा परफॉर्मन्स (जुलै २०१७ पासून)

• ४० टेस्ट मॅचमध्ये २३ मॅच जिंकल्या
• ७६ वनडेमध्ये ५१ मध्ये विजय
• ६० टी२० मध्ये ४० मॅच जिंकल्या

शास्त्रींच्या कार्यकाळात ICC मध्ये ठसा नाही

  • शास्त्रींच्या ट्रेनिंगमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच होमग्राऊंडमध्ये पराभव केला होता.
  • मागच्या महिन्यात वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपची फायनलही खेळली गेली.
  • शास्त्री, श्रीधर आणि विक्रम यांच्या प्रशिक्षणानंतरही टीम इंडिया ‘ICC’ जिंकू शकली नाही.
  • २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला.
  • यानंतर वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या फायनलमध्येही पराभवाचा सामना करावा लागला.

 

द्रविडची होऊ शकते एन्ट्री

  • माजी कॅप्टन राहुल द्रविड टीम इंडियाचे नवीन प्रशिक्षक बनू शकतात.
  • द्रविड यांनी प्रशिक्षण दिलेल्या इंडिया-A आणि भारताच्या अंडर-19 क्रिकेट टीमने चमकदार कामगिरी केली आहे.
  • नुकतंच श्रीलंकेविरोधातल्या सामन्यात राहुल द्रविड टीमसोबत मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत होते.
  • श्रीलंकेविरोधातली वनडे सिरीज टीम इंडियाने जिंकली होती.

Tags: BCCIICCravi shastriTeam Indiaअनिल कुंबळेबॉलिंग कोच भरत अरुणरवी शास्त्रीराहुल द्रविड
Previous Post

“प्रदेश भाजपाच्या शिष्टमंडळाचा दिल्ली दौरा राज्याच्या विकासकामांसाठी उपयुक्त”

Next Post

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरक्षणाचा समर्थकच”! सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळेंचं प्रतिपादन

Next Post
Dattatreya Hosabale

"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरक्षणाचा समर्थकच"! सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळेंचं प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!