मुक्तपीठ टीम
यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी२० वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री, बॉलिंग कोच भरत अरुण, फील्डिंग कोच आर. श्रीधर आणि बॅटिंग कोच विक्रम राठोड टीम इंडियापासून विभक्त होऊ शकतात. ४ वर्षात एकदाही ICC पुरस्कार न जिंकणं हे या मोठ्या निर्णयामागचं कारण असू शकतं. तसंच नोव्हेंबरमध्ये शास्त्रींसह संपूर्ण कोटिंग स्टाफचा कार्यकाळही संपतो आहे. तसंच इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार BCCI टी२० वर्ल्ड कपनंतर नवीन कोचिंग स्टाफ नियुक्त करु इच्छित आहे, जेणेकरुन टीम इंडियाला नव्या उंचीवर नेलं जाऊ शकेल.
टी२० वर्ल्ड कपनंतर शास्त्रींचा संपतोय कॉन्ट्रॅक्ट
- रवी शास्त्री पहिल्यांदा २०१४ मध्ये डायरेक्टर म्हणून टीम इंडियासोबत जोडले गेले.
- त्यांचा कॉन्ट्रॅक्ट २०१६ पर्यंत होता.
- यानंतर शास्त्रींना वर्षभरासाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं गेलं.
- २०१७ मध्ये अनिल कुंबळेंनतर ते टीम इंडियाचे पूर्णवेळ प्रशिक्षक बनले.
- त्यावेळी शास्त्रींचा कार्यकाळ २०१९ च्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत होता.
- २०१९ मधल्या चांगल्या कामगिरीनंतर शास्त्रींचा कॉन्ट्रॅक्ट २०२० टी२० कपपर्यंत वाढवला गेला.
- गेल्या वर्षी कोरोनामुळे टी२० वर्ल्ड कप होऊ शकला नाही. मात्र यावर्षीच्या टी २० नंतर शास्त्रींचा कार्यकाळ संपणार आहे.
- शास्त्रींनंतर एनसीएचे डायरेक्ट राहुल द्रविड टीम इंडियाचे प्रशिक्षक बनू शकतात.
शास्त्रींच्या ट्रेनिंगमधील टीम इंडियाचा परफॉर्मन्स (जुलै २०१७ पासून)
• ४० टेस्ट मॅचमध्ये २३ मॅच जिंकल्या
• ७६ वनडेमध्ये ५१ मध्ये विजय
• ६० टी२० मध्ये ४० मॅच जिंकल्या
शास्त्रींच्या कार्यकाळात ICC मध्ये ठसा नाही
- शास्त्रींच्या ट्रेनिंगमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच होमग्राऊंडमध्ये पराभव केला होता.
- मागच्या महिन्यात वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपची फायनलही खेळली गेली.
- शास्त्री, श्रीधर आणि विक्रम यांच्या प्रशिक्षणानंतरही टीम इंडिया ‘ICC’ जिंकू शकली नाही.
- २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला.
- यानंतर वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या फायनलमध्येही पराभवाचा सामना करावा लागला.
द्रविडची होऊ शकते एन्ट्री
- माजी कॅप्टन राहुल द्रविड टीम इंडियाचे नवीन प्रशिक्षक बनू शकतात.
- द्रविड यांनी प्रशिक्षण दिलेल्या इंडिया-A आणि भारताच्या अंडर-19 क्रिकेट टीमने चमकदार कामगिरी केली आहे.
- नुकतंच श्रीलंकेविरोधातल्या सामन्यात राहुल द्रविड टीमसोबत मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत होते.
- श्रीलंकेविरोधातली वनडे सिरीज टीम इंडियाने जिंकली होती.