मुक्तपीठ टीम
बिग बॉस १३ सिजन विजेता सिद्धार्थ शुक्लाचं हृदयविकारामुळे निधन झालं आहे. वयाच्या ४० व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबईतील कूपर रुग्णालयात त्याला मृत घोषित केलं आहे.त्याच्या अचानक जाण्याने हिंदी टीव्ही विश्वात खळबळ माजली आहे.
सिद्धार्थची कारकीर्द
- सिद्धार्थ मुळचा मुंबईचाच होता.
- एक मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
- २००८ मध्ये, तो बाबुल का आंगन छोटे ना नावाच्या टीव्ही मालिकेत दिसला, पण त्याची खरी ओळख बालिका वधू या मालिकेतून झाली, जी घरोघरी पोहोचली.
- त्याने‘ब्रोकन बट ब्यूटीफुल ३’या वेबसिरीज, आणि ‘दिल से दिल तक’या आणि अनेक मालिकेत भूमिका साकारल्या आहेत.
- टीव्ही इंडस्ट्रीमध्ये यश मिळाल्यानंतर सिद्धार्थ शुक्ला देखील बॉलिवूडकडे वळला.
- तो २०१४ मध्ये हम्प्टी शर्मा की दुल्हनिया चित्रपटात दिसला.
- तो बिग बॉसच्या तेराव्या परावा आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी ७ च्या रिअॅलिटी शोचा विजेता आहे.
- त्यानं सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले आहेत.
- त्याने डिसेंबर २००५ मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर ४० सहभागींना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचं विजेतेपद पटकावले.
सिद्धार्थ आणि शहनाजची हिट जोडी
- बिग बॉस १३ या शोमध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांची जोडी चांगलीच गाजली होती.
- या शोमध्ये त्यांची केमिस्ट्री चांगलीच गाजली होती. शो संपल्यानंतरही चाहते या दोघांना एकत्र पाहू इच्छित होते.
- सिद्धार्थ आणि शहनाज हे करण जौहरच्या बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झाले होते.
View this post on Instagram








Subscribe