Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

येवल्यात अद्ययावत १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय

चांगल्या दर्जाच्या सुविधा मनुष्यबळासह पुरवण्याच्या भुजबळाच्या सुचण्या

February 15, 2021
in सरकारी बातम्या
0
chhagan bhujbal

मुक्तपीठ टीम

येवला येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे अद्ययावत सुसज्ज १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्यात आले आहेत. या नव्या विस्तारिकरणाचे उद्घाटन छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ तातडीने पुरविण्याच्या सुचना इमारतीचे विस्तारीकरण उद्घाटन प्रसंगी  राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

यावेळी आमदार नरेंद्र दराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शरद राजभोज, कार्यकारी अभियंता प्रशांत सोनाग्रा, उप विभागीय अधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी. गांडाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रशांत खैरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शैलजा कृप्पास्वामी, वैशाली सारंग पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती संजय बनकर, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, मकरंद सोनवणे, सुनील पैठणकर, सचिन कळमकर यांच्यासह अधिकारी व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी बोलतांना पालकमंत्री  भुजबळ म्हणाले की, ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे आज १०० खाटांच्या जिल्हा उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन होत असून तालुक्यातील नागरिकांना उत्तम प्रकारची आरोग्य सेवा पुरविली जाणार आहे. या चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा नागरिकांना पुरविण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयासाठी या अगोदरच एकूण ९७ नवीन पदांना मंजुरी मिळाली आहे. त्यात एक वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया, वैद्यकीय स्त्री व प्रस्तुती रोग तज्ञ, दोन बधिरीकरण शास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी भिषक, बालरोगतज्ञ, एक अस्थिव्यंग तज्ञ, एक नेत्र शल्यचिकीत्सक, एक दंत चिकित्सक, एक वैद्यकीय अधिकारी अपघात, एक वैद्यकीय अधिकारी, एक सहाय्यक अधिसेविका, पाच परिसेविका, एक प्रशासकीय अधिकारी, एक कार्यालयीन अधीक्षक तर २० अधिपरिचारिका यांच्यासह एक भौतिकोपचार तज्ञ,एक आहार तज्ञ, दोन रक्तपेढी तज्ञ, एक प्रयोगशाळा शास्त्रज्ञ, एक क्षकिरण विभाग,एक इसीजी तंत्रज्ञ, दोन औषध निर्माण अधिकारी, दोन प्रयोगशाळा सहाय्यक, एक भांडार तथा वस्त्रपाल, एक बाह्यरुग्ण सेवक, तीन अपघात विभाग सेवक, १ रक्तपेढी परिचर, दोन शस्त्रक्रिया परिचर, एक व्रणोपचारक, दोन बाह्यरुग्ण लिपिक, ६ कक्षसेवक, एक शिपाई, एक सफाईगार अशी पदे मंजूर करण्यात आली आहे.

chhagan bhujbal (1)
या ठिकाणी हॉस्पिटलचा विस्तार करण्यासाठी जागा उपलब्ध असून यापुढील काळातही रुग्णालयाचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारे अद्ययावत अत्याधुनिक साधनसामग्री व सोई सुविधा पुरविण्यात येईल.

पुढे बोलतांना पालकमंत्री भुजबळ म्हणाले कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आपली तसेच कुटूंबाची व इतरांची काळजी घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर कोरोना वाढणार नाही, त्यासाठी आपण सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

 

नाशिक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले असून यंदाच्या वर्षी शासकीय पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे.

chhgan bhujbal hospital
आमदार नरेंद्र दराडे यांनी यावेळी बोलताना, पालकमंत्री  भुजबळ यांनी येवल्यात प्रतिनिधित्व केल्यानंतर विविध विकास कामे करून विविध प्रश्न सोडविले आहे. आज येवला उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण केले असून तालुक्यातील नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.

यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी. गांडाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शरद राजभोज यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कोरोना योध्दयांचा सन्मान
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोरोना काळात यशस्वीपणे जबाबदारी पार पडलेल्या डॉ. शेलेजा कुप्पास्वामी डॉ.अरुण चव्हाण, डॉ. बाळासाहेब लोखंडे,डॉ. निल शिरसाठीया, डॉ.ज्ञानेश्वर सोनवणे,डॉ. हितेश गायकवाड, डॉ.जितेंद्र डोंगरे, डॉ. हनुमंत पळवे, डॉ. अनंत तारु, सर्वश्री अजित कुळघर, दिपक सोळुंके,  संगिता साबळे या वरिष्ठ वद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वेद्यकीय अधिकारी,ओषध निर्माता अशा अधिकारी कर्मचारी कोविछ कोरोना योद्धयांचा सन्मान प्रमाणपत्र देवून करण्यात आला.

तत्पुर्वी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य उपसंचालक डॉ. पी.डी. गांडाळ यांनी केंले, तर आभार प्रदर्शन वैद्यकीय अधीक्षक डॉ.शैलजा कृप्पास्वामी यानी केले. नाशिक डाएटचे उदयकुमार कुलथे यांनी केली.


Tags: chhagan bhujbalyeolaनरेंद्र दराडेमंत्री छगन भुजबळ
Previous Post

#प्रेरणा ७३ वर्षाच्या बोंडे मॅडम मातृत्व आणि ममत्वाचा प्रेरणादायी अखंड खळखळणारा झरा…

Next Post

इंडियन मिलिटरी कॉलेजची प्रवेश पात्रता परीक्षा ५ जून रोजी

Next Post
milatry-school

इंडियन मिलिटरी कॉलेजची प्रवेश पात्रता परीक्षा ५ जून रोजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!