Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मका, ज्वारी आणि बाजरी खरेदीचा लक्षांक वाढल्याने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

January 13, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
मा.छगन भुजबळ यांची मीटिंग 1

मुक्तपीठ टीम

किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२०-२१ साठी भारत सरकारने १५ लाख १८ हजार क्विंटल मका आणि २ लाख ५० हजार क्विंटल ज्वारी त्याचप्रमाणे ६० हजार क्विंटल पर्यंत बाजरी खरेदीसाठी राज्य सरकारला मान्यता दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

 

खरीप हंगाम २०२०-२१साठी किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत 4 लाख 4 हजार 900 क्विंटल मका, ९ हजार ५०० क्विंटल बाजरी तर १५ हजार ४३६ क्विंटल ज्वारी खरेदीसाठी केंद्र शासनाने राज्य सरकारला मान्यता दिलेली होती. महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनमार्फत राज्यात १२२ व आदिवासी विकास महामंडळामार्फत ५२ खरेदी केंद्रांद्वारे भरडधान्य खरेदी सुरू करण्यात आली होती.

 

मात्र राज्यात झालेल्या पीक पध्दतीतील बदलांमुळे राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका आणि बाजरीचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे खरीप हंगाम २०२०-२१ साठी भारत सरकारने दिलेले ४ लाख ४ हजार ९०० क्विंटल मका आणि ९ हजार ५०० बाजरी खरेदीचे उद्दिष्ट्य दि. १४ डिसेंबर २०२० रोजी पूर्ण झाल्यामुळे १५ डिसेंबर २०२० पासून मका आणि बाजरीची खरेदी बंद झालेली होती.

 

राज्यातील शेतकऱ्यांची मका, ज्वारी आणि बाजरीची खरेदी अजून बाकी राहिल्यामुळे १५ लाख क्विंटल मका, २ लाख ५० हजार क्विंटल ज्वारी आणि १ लक्ष ७ हजार क्विंटल बाजरी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाने केंद्र सरकारकडे मागणी केलेली होती.

 

राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत मका आणि बाजरीचे उद्दिष्ट वाढवून देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. केंद्र सरकारने मका, ज्वारी आणि बाजरी खरेदीसाठी राज्याला उद्दिष्ट वाढवून दिल्यामुळे कोरडवाहू खरिपाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. भरड धान्य खरेदी ३१ जानेवारी २०२१ पर्यंत सुरु राहणार आहे.


Tags: Food and Civil Supplies MinisterMinister Chhagan Bhujbalmuktpeethअन्ननागरी पुरवठा मंत्रीमंत्री छगन भुजबळमुक्तपीठ
Previous Post

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन

Next Post

#व्हा_अभिव्यक्त रडीचा डाव नको…अंहकार सोडत शेतकऱ्यांचा विश्वास कमवा !

Next Post
Farmer Protest 12-1-21

#व्हा_अभिव्यक्त रडीचा डाव नको...अंहकार सोडत शेतकऱ्यांचा विश्वास कमवा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!