Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचा नांदेड जिल्ह्यातील भोसी पॅटर्न

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bhosi

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरांबरोबर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण होत आढळल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामीण जनतेत कोरोनाविषयी जनजागृती करणे आणि त्याबरोबरच कोरोनाच्या प्रसाराला रोखण्याच्या पंचायत राज संस्थांना प्रयत्नांना सहकार्य करणे तितकेच महत्वाचे आहे असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात दिला आहे. मात्र, त्याआधीच काही गावांनी ग्रामीण भागातील कमतरतानाच आपली बळकट बाजू बनवून, कोरोनाच्या संकटात गावाला सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील सहा हजार लोकसंख्या असलेल्या भोसी या गावाने कोरोनामुक्तीसाठी चोखाळलेल्या मार्ग ही असाच एक यशस्वी प्रयत्न असून आता प्रशासन जिल्ह्यातील इतर गावांमध्ये त्याचे अनुकरण करणार आहे.

एका लग्न समारंभांनंतर भोसी गावात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देशमुख भोसीकर यांनी पुढाकार घेऊन, ग्राम पंचायत आणि आरोग्य विभागाच्या समन्वयाने गावात आरोग्य शिबीर आयोजित करून त्यात गावकऱ्यांच्या रॅपिड अॅनटीजेन आणि आरटीपीसीआर कोरोना चाचण्या केल्या. त्यात तब्बल ११९ गावकरी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.

या चाचण्यांमध्ये बाधित आढळलेल्या सर्व गावकऱ्यांचा गावातील अन्य व्यक्तींशी संपर्क टाळून, संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी त्यांना केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आपापल्या शेतात १५ ते १७ दिवस विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले. शेतमजूर आणि स्वतःची शेती नसलेल्या अन्य बाधितांची सोय जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देशमुख भोसीकर यांनी आपल्या शेतात एक ४० बाय ६० आकाराची शेड उभारून त्यात केली.

गावातील आशा कार्यकर्ती आणि अंगणवाडी सेविका या दररोज या रुग्णांना भेट देऊन त्यांची विचारपूस करत असत. या रुग्णांना जेवण, आवश्यक ती औषधे आणि अन्य गरजेच्या वस्तू ग्रामसेवक आणि आरोग्य विभाग यांनी उपलब्ध करून दिल्या

या गावकर्यांनी १५ ते २० दिवस विलगीकरणात काढल्यानंतर त्यांची भोकर या तालुक्याच्या गावी आरोग्य तपासणी झाल्यानंतरच ते कोरोनामुक्त व्यक्ती म्हणून गावात परतले .

लक्ष्मीबाई अक्केमवाड आणि विशाल कल्याणकर या दोघा रुग्णांनी आपला विलगीकरणाचा अनुभव सांगत शेतात राहून संसर्गाची साखळी तोडल्यानेच गावातले इतर नागरिक बाधित होण्यापासून वाचले असे सांगितले.

विशेष म्हणजे गावातील कुठल्याही रुग्णाला कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले नाही.

कोरोनाबाधित व्यक्तींना इतरांच्या संपर्कात येऊ न देणे, कोरोनाविषयीचे सर्व नियम पाळणे एवढ्या साध्या उपायांच्या मदतीने पुरेशी आरोग्य सुविधा नसलेली गावेही कोरोना मुक्त होऊ शकतात असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देशमुख भोसीकर यांनी व्यक्त केला .

भोसी गाव पूर्णपणे कोरोनातून मुक्त झालं असून गेल्या दिड महिन्यात गावात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण सापडला नाही असेही भोसीकर यांनी आवर्जून सांगितले.

नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या १५८ कोरोना स्पॉटपैकी २८ ठिकाणे ही कोरोना हॉटस्पॉट आहेत, त्यापार्श्वभूमीवर कोरोनामुक्तीचा हा भोसी पॅटर्न हा सध्या जिल्ह्यात नावाजला जात आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी गावकरी , लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या एकत्रित समन्वयाचे चांगले उदाहरण असलेला हा भोसी पॅटर्न जिल्ह्यातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी राबविणार असल्याचे सांगितले आहे.


Tags: bhosi patterncoronanandedPM Narendra modiकोरोनानांदेडपंतप्रधान नरेंद्र मोदीभोसी
Previous Post

सोनू सुदचा डॉक्टरांना प्रश्न, “जी औषधं उपलब्ध नाहीत, ती का सुचवता”?

Next Post

तौत्के चक्रीवादळाची पूर्वसूचना, तरीही ओएनजीसीची जहाजे का अडकली? चौकशीसाठी समिती

Next Post
tauktae

तौत्के चक्रीवादळाची पूर्वसूचना, तरीही ओएनजीसीची जहाजे का अडकली? चौकशीसाठी समिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!