Monday, September 28, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयुष्य वाढवण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणारा भोंदूबाबा जेरबंद!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
vilas bapurao pawar dhongi baba

मुक्तपीठ टीम

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तुझ्या पोटात तीन गाठी आहेत, त्यामुळे तुझे थोडेच आयुष्य राहिले आहे, जगायचे असेल तर माझ्याशी शरीरसंबंध ठेव, अशी घृणास्पद मागणी एका भोंदूबाबाने वारंवार महिलेकडे केली होती. दरम्यान या प्रकरणी वाकड पोलिसांनी सापळा रचत भामट्याला बीडवरून पकडले आहे. विलास बापूराव पवार उर्फ ‘महाराज’असं अटक केलेल्या या आरोपीचे नाव आहे.

 

नेमके प्रकरण काय?

  • २१ डिसेंबर रोजी एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
  • महाराज या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विलास पवारने महिलेला फोन केला.
  • कमरेच्या खाली पांगळे करण्याबाबत तुझ्या पतीने सांगितले असल्याचे आरोपीने महिलेला सांगितले.
  • महिलेला ‘तुझ्या पोटात दोन ते तीन गाठी असून त्याचे आयुष्य थोडेसे राहिले आहे’ असे सांगून आरोपीने महिलेला वारंवार फोन करत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
  • ज्या माणसाच्या उजव्या तळहात आणि गुप्तांगावर तीळ आहे.
  • त्याच्याशी तुम्ही शारीरिक संबंध ठेवले, तर तुम्हाला कोणीही काही करु शकणार नाही, असे आरोपीने महिलेला सांगितले. त्यानंतर त्याने स्वतःचा एक अश्लिल व्हिडीओ पाठवून त्यात उजव्या हात आणि गुप्तांगावरचे तीळ दाखवले.
  • व्हिडीओ पाठवल्यानंतर पुन्हा पीडित महिलेला कॉल करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.
  • माझ्याशी शरीरसंबंध ठेवले, तर तुमचे सगळे कुटुंब सुखी राहील.
  • तुम्हाला तुमचे कुटुंब सुखी ठेवायचे असेल तर माझ्याशी शरीरसंबंध ठेवा, असे म्हणून वारंवार शरीरसुखाची मागणी करुन पीडीत महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.

 

पोलिसांनी असा रचला सापळा

या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३५४ (ड), २९२, ५००, ५०९ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ चे कलम ६७ (ए), नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत आणि त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकड पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या मदतीने २५ डिसेंबर रोजी आरोपीला पकडण्यसाठी डांगे चौक येथे सापळा लावला.
आरोपी डांगे चौकात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.


Tags: pimpri chinchwadpuneVilas Bapurao PawarWakad policeपिंपरी चिंचवडपुणेवाकड पोलिसविलास बापूराव पवार
Previous Post

महिला सुरक्षेसाठी साताऱ्याचा पायलट प्रोजेक्ट संपूर्ण राज्यात सुरु करणार!

Next Post

आधी निवडणूक धक्का, आता राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र: “तुमचं पत्र अपमान आणि बदनामीकारक! “

Next Post
governor letters to cm uddhav thackeray

आधी निवडणूक धक्का, आता राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र: "तुमचं पत्र अपमान आणि बदनामीकारक! "

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!