मुक्तपीठ टीम
मुंबईतील भांडुपमधील ड्रिम मॉलमधील सनराइझ रुग्णालय हे अग्निप्रतिबंधाच्याबाबतीत मृत्यूचा सापळाच असल्याचा आरोप करण्यात येत आहे. स्थानिक जागरूक नागरिकांनी समाजमाध्यमांमध्ये पोस्ट केलेल्या छायाचित्रांमध्ये मॉल आणि रुग्णालयाचे आपत्कालिन मार्ग कचऱ्याच्या ढिगाने कोंडलेला दिसत आहे. अग्निकांडातील बळींची संख्या दुपारपर्यंत दहा झाली होती.
मुंबई अग्निशमन दल सुत्रांकडून अग्निकांडाविषयी खालील माहिती मिळाली आहे:
काल दिनांक २५/०३/२०२१ रोजी रात्रौ २३:४९ वाजताच्या सुमारास ड्रीम्स मॉल, एल. बी. एस. मार्ग, भांडूप(प.) येथे सनराईझ हॉस्पिटलमध्ये आग लागली असून सदर घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचे १४-फायर वाहन आणि १०-जम्बो वॉटर टँकर, १०-रुग्णवाहिका, ०१-टी. टी. एल. व ०१-बी.ए. वाहन उपस्थित आहेत. सदरची आग लेवल-४ ची असून अग्निशमन दलाच्या जवानांन कडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. हॉस्पिटलमधील सर्व रुग्णांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले असून सदर घटनेत १० रुग्णांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झालेला असून ५ रुग्ण किरकोळ जखमी झालेले आहे, त्यांना पुढील उपचारासाठी इतर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे असे मुंबई आ. व्य. कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार अद्ययावत.
मृत झालेल्या रूग्णांची माहिती पुढीप्रमाणे
१) श्री. निसार जावेद चंद्र (पु/ वय:- ७४ वर्ष)
२) श्री. गोविंदलाल दास (पु/ वय :- ८० वर्ष)
३) श्री. रवींद्र मुंगेकर (पु/ वय:-६६ वर्ष)
४) श्रीमती. मंजुळा बथारिया (स्त्री/ वय:-६५ वर्ष)
५) श्री. अंबाजी पाटील (पु/ वय:-६५ वर्ष)
६) श्री. सुधीर लाड (पु/ वय:-६६ वर्ष)
७) श्रीमती. सुनंदाबाई पाटील (स्त्री/ वय:-५८ वर्ष)
८) श्री. हरीप सचदेव (पु/ वय:-६८ वर्ष)
९) श्री. श्याम भक्तीलाल (पु/ वय:-७७ वर्ष)
१०) अज्ञात
जखमी झालेल्या रुग्णांची माहिती पुढीप्रमाणे
१) श्री. चेतनदास गोडवाणी (पु/ वय:- ७८ वर्ष)
२) श्रीमती. माधुरी गोडवाणी (स्त्री/ वय:- ६८ वर्ष)
३) श्री. गिरीश मेमौन (पु/ वय:-४३ वर्ष)
४) श्री. कुलदीप मेहता (पु/ वय:-४८ वर्ष)
५) श्री. पुष्पक दरे (पु/ वय:-६५ वर्ष)
इतर ३० रुग्णांना मुलुंड जम्बो कोविड हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
मॉल रुग्णालय हलगर्जीपणाच्या चौकशीची मागणी
मानवाधिकार कार्यकर्ते जयेश मिराणी यांनी मॉल रुग्णालयाबद्दल स्थानिक रहिवाशांनी केलेल्या तक्रारींकडे लक्ष वेधत कारवाईची मागणी केली आहे. अशा ठिकाणी रुग्णालयांना परवानगी देणे म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळ आहे, असेही ते म्हणालेत.