Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईच्या रुग्णालय अग्निकांडांनं गंभीर प्रश्न: “मॉलमध्ये रुग्णालय कसं?”

March 26, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
bhandup fire

 मुक्तपीठ टीम

मुंबईमध्ये भांडूपमधील ड्रिम मॉलमधील रुग्णालयात लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी गेलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालय मॉलमध्ये असल्याने धक्काच बसला. त्या म्हणाल्या, “पहिल्यांदाच मी मॉलमध्ये रुग्णालय पाहत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे.”

कशी लागली आग

  • भांडूप पश्चिमेकडे प्रसिद्ध ड्रीम मॉलला रात्री १२ च्या सुमारास भीषण आग लागली.
  • ही आग शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
  • या मॉलमध्ये सनराईज रुग्णालय चालवले जाते. त्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवरही उपचार सुरु होते. सुरुवातीला ही आग मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. त्यानंतर ती आग भडकली. मॉलमधील रुग्णालयातही वेगाने आग पसरली.
  • या रुग्णालयात ७६ रुग्णांवर उपचार सुरु होते. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

“आगीमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. भांडूपमधील आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या अग्निशमन दलाच्या २२ ते २३ गाड्या घटनास्थळी उपस्थित असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.” या मॉलच्या चारही बाजूला आग पसरल्याने अग्निशमन दलाला रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू असून उरलेल्या ७४ रुग्णांना तातडीनं दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.“७३ पैकी ३० रुग्णांना मुलुंडच्या जम्बो सेंटरमध्ये हलवण्यात आलं असून तिघांना फोर्टिस रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं आहे,” अशी माहिती एका वरिष्ठ डॉक्टरांनी दिली आहे.

अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु असताना महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल झाल्या. “पहिल्यांदाच मी मॉलमध्ये हॉस्पिटल पाहत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. सात रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. ७४ रुग्णांना इतर रुग्णालयात नेण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.

 

भांडूप येथे सनशाईन रुग्णालयाला भीषण आग लागण्याची घटना घडली त्याप्रसंगी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला सोबत अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी वृंद@mybmc @AUThackeray pic.twitter.com/UGNxcg3siy

— Kishori Pednekar (@KishoriPednekar) March 25, 2021

 

अग्निशमन दलाची अधिकृत माहिती:

गुरुवारी दिनांक २५/०३/२०२१ रोजी ३रात्रौ २३:४९ वाजताच्या सुमारास ड्रीम्स मॉल, एल. बी. एस. मार्ग, भांडूप(प.) येथे सनराईझ हॉस्पिटलमध्ये आग लागली.
सदर घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचे १४-फायर वाहन आणि १०-जम्बो वॉटर टँकर, १०-रुग्णवाहिका, ०१-टी. टी. एल. व ०१-बी.ए. वाहन उपस्थित आहेत. सदरची आग लेव्हल-४ ची असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.


Tags: dream mallMayor Kishori Pednekarsunrise hospital fireड्रिम मॉलमहापौर किशोरी पेडणेकरसनराईज रुग्णालय
Previous Post

विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये १३ पदांवर भरती

Next Post

रश्मी हेडे यांना ‘स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार’

Next Post
rashmi hede

रश्मी हेडे यांना 'स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!