Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भंडारा आग चौकशी अहवाल सादर, निलंबन-सेवा समाप्तीची कारवाई

सर्व जिल्हा रुग्णालयांचे १५ दिवसात हेल्थ ऑडिट - आरोग्यमंत्री राजेश टोपे

January 21, 2021
in आरोग्य, घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Dr Rajesh Tope

मुक्तपीठ टीम

भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेचा चौकशी अहवाल समितीने काल सादर केला. त्यांच्या शिफारशीनुसार या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक यांना निलंबित करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांची बदली, एसएनसीयूच्या विभाग प्रमुख तसेच परिसेविका यांच्यावर निलंबनाची आणि दोन अधिपरिसेविका व एक बालरोगतज्ज्ञ यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

 

कुणावर काय कारवाई?

  • भंडारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते निलंबित

  • अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिला बडे यांची अकार्यकारी पदावर बदली

  • वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना मेश्राम निलंबित

  • परिसेविका ज्योती भारसकर निलंबित

  • कंत्राटी अधिपरिसेविका स्मिता आंबिलडुके आणि शुभांगी साठवणे सेवा समाप्ती

  • कंत्राटी बालरोग तज्ज्ञ डॉ.सुशिल अंबादे सेवा समाप्ती

दरम्यान या दुर्घटनेचा बोध घेऊन राज्य शासनाच्या मार्फत राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांचे 15 दिवसात हेल्थ ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य आयुक्त डॉ.रामास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून त्यांचा अहवाल आल्यानंतर कृती आराखडा तयार करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी सांगितले. जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून आरोग्यसंस्थांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सर्व पालकमंत्र्यांना पत्र देण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले, चौकशी समितीच्या अभिप्रायानुसार एसएनसीयूमधील इलेक्ट्रीक सक्रीटमध्ये आग लागल्याचे सकृत दर्शनी दिसून येत आहे. या दुर्दैवी घटनेत दहा नवजात बालकांचा मृत्यु झाला. नागपूर विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या घटनेची चौकशी केली. त्यामध्ये या कक्षाची जबाबदारी असलेल्या वैद्यकीय अधिकारी, नर्स आणि त्यांच्यावर पर्यवेक्षणाची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबन आणि सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

 

 


Tags: Bhandara hospitalbhandara hospital firedr rajesh topeडॉ. राजेश टोपेभंडारा अग्निकांडभंडारा रुग्णालय आग
Previous Post

जलसंघारण दुरुस्तीतील घोटाळे टाळण्यासाठी जीओ टॅगिंग, व्हिडीओ चित्रिकरण

Next Post

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ‘त्या’ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक शुल्क

Next Post
dhananjay munde

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 'त्या' मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक शुल्क

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!