मुक्तपीठ टीम
भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार बायचुंग भूतिया यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरजला या वर्षीचा खेलरत्न पुरस्कार दिलाच पाहिजे, असे स्पष्ट मत मांडले. भूतिया हे राष्ट्रीय क्रीडा समितीचे सदस्य आहेत. नीरजने ८७.५८ मीटर भाला फेकून इतिहास रचला होता . ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार नीरज चोप्राला दिला पाहिजे, कारण त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले ट्रॅक आणि फील्ड सुवर्णपदक जिंकले.
खेलरत्नसाठी निवड समितीसमोर आव्हानं!
- भुतिया म्हणाले, केवळ यावेळीच नाही तर प्रत्येक वेळी निवड समितीसमोर मोठे आव्हान असतं.
- पण या वर्षी समितीपुढे मोठे आव्हान असेल कारण या पुरस्कारास पात्र असलेले अनेक खेळाडू आहेत.
- माझ्या दृष्टीने, यावेळी अनेक पदक विजेते आहेत, त्यामुळे या वेळी आव्हान पूर्वीपेक्षा अधिक कठीण आहे.
SAIच्या ५५ व्या गर्वनिंग बॉडी बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती भुतियांनी दिली. तसेच देशातील क्रीडा संस्कृती कशी विकसित करता येईल यावर चर्चा झाल्याचेही ते म्हणाले. तळागाळात आणखी प्रशिक्षक तयार करण्याबद्दलही विचार मांडले गेले. दीर्घकालीन योजना तयार करण्यावर भर देण्याविषयी भुतियांनी सुचवले.