Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲप’चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकर्पण

September 29, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Ajit pawar

मुक्तपीठ टीम

सध्याचे युग माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. ‘डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲप’च्या माध्यमातून बारामती शहरातील नागरिकांच्या शासकीय, प्रशासकीय, वैद्यकीय, नागरी सुविधा, आपत्कालीन मदत अशा अनेक गरजा मोबाईलच्या एका ‘क्लिक’वर पूर्ण होणार आहेत. या ॲपच्या माध्यमातून बारामतीकरांच्या दैनंदिन गरजांची सुलभतेने पूर्तता करण्याचा प्रयत्न असून, या माध्यमातून त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुसह्य होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

 

येथील सह्याद्री अतिथीगृहात बारामती नगरपरिषद, आयसीआयसीआय फाऊंडेशन, रेव्हमॅक्स टेलिकॉम, उन्नती डिजीटल या संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार करण्यात आलेल्या ‘डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲप’चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, रेल्वेचे पोलीस आयुक्त कैसर खालिद, आयसीआयसीआय फाऊंडेशनचे विनीत रुंगटा, कौस्तुभ बुटाला उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी देशात संगणक क्रांती घडवून आणली. त्यांनी त्या काळात दाखविलेली दूरदृष्टी, आज देशाला उपयुक्त ठरत आहे. देशातील आजची मोबाईल क्रांती, डिजिटल क्रांती राजीव गांधींनी रचलेल्या संगणक क्रांतीच्या पायावर उभी आहे. बारामती नगरपरिषदेच्यावतीने ‘डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲप’ची निर्मिती करुन नवे पाऊल टाकले आहे. या ‘डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲप’च्या माध्यमातून टेलीमेडिसिन अ‍ॅप, क्यूआर कोड आधारित मालमत्ता व्यवस्थापन ॲप, जीआयएस टॅगिंग या कामावर देखरेखीचे ट्रॅकिंग प्रणाली, फिनएक्सा हे प्रॉपर्टी मॅनेजमेंट संबंधीचे ॲप, स्थानिक व्यवसायांच्या जाहीरातींसाठी ‘एलओसी ऑफ ॲप’, आपत्कालीन स्थितीत वैयक्तिक बचावासाठी एसओएस ॲप, जीआरएस हे तक्रार निवारण प्रणालीसंबंधीचं ॲप एकत्र उपलब्ध होणार आहेत.

 

मोबाईलच्या एका क्लिकवर सर्व ॲप उपलब्ध झाल्याने, बारामतीकरांना दैनंदिन गरजांसाठी घराबाहेर जाण्याची गरज नाही. अर्ज देण्याचा, अर्जाची पोच घेण्याचा, संबंधितांना भेटून विनंती करण्याचा त्रास या ॲपमुळे वाचणार आहे. ॲपच्या माध्यमातून केलेल्या मागणी, विनंती, तक्रारीची नोंद डिजिटली आपोआप होईल. त्यामुळे अर्जाचा पाठपुरावाही ऑनलाईन करणे शक्य होईल. या ॲपच्या माध्यमातून बारामतीकरांचे जीवन, दैनंदिन व्यवहार, अधिक सहज, सोपे, सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी, हे अम्ब्रेला ॲप डाऊनलोड करावे, घरबसल्या नागरी सुविधा मिळवण्यासाठी या ॲपचा वापर सर्वांनी करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, विनीत रुंगटा यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौस्तुभ बुटाला यांनी केले.

 

‘बारामती डिजिटल अम्ब्रेला ॲप’च्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधा

  • टेलीमेडिसिन अ‍ॅप
  • क्यूआर कोड आधारित मालमत्ता व्यवस्थापन
  • जीआयएस टॅगिंग: कार्य ट्रॅकिंग आणि देखरेख प्रणाली
  • फिनएक्सा: संपत्ती व्यवस्थापन सोल्यूशन्स
  • एलओसी ऑफ (स्थानिक व्यवसायाची जाहिरात)
  • एसओएस- आमचे जीवन वाचवा (वैयक्तिक आपत्कालीन बचाव)
  • तक्रार निवारण प्रणाली (जीआरएस)

 


Tags: ajit pawarMinister Vijay wadettiwarउपमुख्यमंत्री अजित पवारबारामती डिजिटल अम्ब्रेला ॲपविजय वडेट्टीवार
Previous Post

“बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात शाळांना आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी”: शरद पवार

Next Post

“या वर्षी नीरज चोप्राला ‘खेलरत्न’ मिळायलाच हवा”

Next Post
Neeraj Chopra

"या वर्षी नीरज चोप्राला 'खेलरत्न' मिळायलाच हवा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!