मुक्तपीठ टीम
माणसांमध्ये जिद्द, ताकद आणि काही करण्याची तीव्र इच्छा असेल तर अशक्य काहीच नसतं. वयही आडवं येवू शकत नाही. फिनलंडमध्ये झालेल्या वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये २ भारतीय आजी-आजोबांनी बजावलेली कामगिरी जबरदस्त आहे. तर केरळमधील माजी आमदार जेकब यांनीही पदक मिळवले. तेही ८२ वर्षांचे आहेत.
भगवानी देवी या ९४ वर्षांच्या या धावपटू आहेत. त्यांनी १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांनी ज्येष्ठ नागरिक या कॅटेगरीत २४.७४ सेकंदात १०० मीटर शर्यत पूर्ण केली. यासोबतच भगवान देवीने शॉटपुटमध्येही कांस्यपदक पटकावले.
भगवानी देवींची तुफान कामगिरी
- यापूर्वी चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भगवान देवीने तीन सुवर्णपदके जिंकली होती.
- अशा प्रकारे जागतिक मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा हक्क मिळवला.
- चेन्नईतील कार्यक्रमापूर्वी, त्यांनी दिल्ली राज्य अॅथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये १०० मीटर डॅश, भालाफेक आणि शॉट पुटमध्ये तीन सुवर्णपदके जिंकली होती.
केरळचे माजी आमदार एमजे जेकब यांनी दोन कांस्यपदके जिंकली
- वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप हे ज्येष्ठ खेळाडूंसाठी एक व्यासपीठ आहे.
- भारतातील आणखी एक अनुभवी खेळाडू, केरळ राज्याचे माजी आमदार, एमजे जेकब यांनीही जागतिक मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दोन कांस्यपदके जिंकली.
- पिरावोम येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने एम८० कॅटेगरीत २०० मीटर अडथळ्यांची शर्यत आणि ८० मीटर अडथळ्यांची शर्यत या प्रकारात पदके जिंकली.
- ८० ते ८४ वयोगटातील खेळाडूंसाठी हे आयोजन करण्यात आले होते.
- माजी आमदार जेकब यांच्या नावावर अनेक पदके आहेत.
- या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या केरळ राज्य मास्टर्स अॅथलेटिक्समध्ये जेकब यांनी २०० मीटर आणि ८० मीटर बाधा दौड शर्यतीतही सुवर्णपदक जिंकले.