Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

गुजराती, राजस्थानी गेले तर तुमच्याकडे पैसे उरणार नाहीत! मुंबईला आर्थिक राजधानी म्हणूच शकणार नाही!!-भगत सिंह कोश्यारी

July 30, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
bhagat singh koshyari controversial statement

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. यावेळीही त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास येथे पैसेच शिल्लक राहणार नाहीत आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलं. या वक्तव्यावरुन नव्या वादाला सुरुवात झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.

काय म्हणाले राज्यपाल?

  • कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं.
  • मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.
  • जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उद्घाटन सोहळ्याला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लवेकर व पंकज भोयर, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी प्रामुख्याने उपस्थित होते.

सचिन सावतांचा आक्षेप

  • सचिन सावंत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
  • राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे, अशी भूमिका सचिन सावंत यांनी घेतली आहे.

राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे. pic.twitter.com/jfM1pQ4p0w

— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 29, 2022

राज्यपालांविरोधात मनसे आक्रमक…

  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे.
  • ज्या गोष्टीची माहिती नाही, महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही, त्यावर बोलू नये, नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसण्याची गरज नाही.
  • हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र किंबहुना मुंबईच्या प्रगतीमध्ये मराठी माणसाचा हात आहे, इथे बाकी लोक आले, त्यांनी स्वतःची प्रगती केली, त्यामुळे महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या प्रगतीत त्यांचा हात नाही, असेलच तर त्यांच्या प्रगतीत महाराष्ट्र किंवा मुंबईचा हात आहे, १०५ हुतात्म्यांनी बलिदान देऊन ही मुंबई महाराष्ट्रात आणली आहे, त्यामुळे ज्या गोष्टी माहिती नाही, इतिहास माहिती नाही, नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे

राज्यपालांच्या वक्तव्याचा राऊतांकडून निषेध!!

  • राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे.
  • राऊतांनी चार ट्वीट करत राज्यपालांवर टीका केली आहे.
  • महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला. स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका..मुख्यमंत्री शिंदे..राज्यपालांचा साधा निषेध तरी करा.मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला..स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका..मुख्यमंत्री शिंदे..राज्यपालांचा साधा निषेध तरी करा.मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे..
ऐका .. ऐका… pic.twitter.com/dOvC2B0CFu

— Sanjay Raut (@rautsanjay61) July 30, 2022

  • पुढे त्यांनी, काय ती झाडी..काय तो डोंगर..काय नदी..आणि आता…काय हा मराठी माणूस ..महाराष्ट्राचा घोर अपमान! ५० खोके वाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत, म्हटलं आहे.

काय ती झाडी..
काय तो डोंगर..
काय नदी..
आणि आता…
काय हा मराठी माणूस ..
महाराष्ट्राचा घोर अपमान!
50 खोके वाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत..

जय महाराष्ट्र… pic.twitter.com/U30CdS0TSW

— Sanjay Raut (@rautsanjay61) July 30, 2022

  • थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे… १०५ मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता. मुख्यमंत्री शिंदे, ऐकताय ना. की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे. स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा.. दिल्ली पुढे किती झुकताय? असा प्रश्न राऊतांनी केला आहे.

थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा
आहे…
105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता..
मुख्यमंत्री शिंदे …ऐकताय ना.
की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे..
स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा..
दिल्ली पुढे किती झुकताय? pic.twitter.com/qhjQ3nGEwf

— Sanjay Raut (@rautsanjay61) July 30, 2022

  • राऊतांनी म्हटलं आहे की, आता तरी.. ऊठ मराठ्या ऊठ.. शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे.. बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत.. मराठ्या तुलाच उठावे लागेल.

आता तरी..
ऊठ मराठ्या ऊठ..
शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे..
बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत..
मराठ्या तुलाच उठावे लागेल.. pic.twitter.com/QYX4weHdQ2

— Sanjay Raut (@rautsanjay61) July 30, 2022

राज्यपालांच्या वक्तव्यावर शिंदे गट नाराज!!

  • राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली आहे.
  • शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले की, राज्यपाल घटनात्मक पद आहे. त्यामुळे कोश्यारी यांच्याकडून यापुढे अशी विधाने येणार नाही अशी सूचना केंद्राने द्यावी.
  • मुंबईच्या उभारणीत सगळ्याच समाजाचा वाटा आहे.
  • मात्र, त्यातही मोठा वाटा मराठी माणसांचा आहे.
  • मुंबईतील औद्योगिक उभारणीत मुंबईच्या उभारणीत पारशी समुदायाचे मोठं योगदान आहे.
  • एखाद्या समाजाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या समाजाने पैसा काढला की मुंबईत काही राहणार नाही असे वक्तव्य म्हणजे राज्यपालांचा मुंबईबाबतचा अभ्यास कमी आहे, याचे द्योतक आहे.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दौऱ्यावरून मुंबईत आल्यानंतर सगळे आमदार त्यांना भेटणार आहोत.
    राज्याच्या भावना राज्यपालांनी जपल्या पाहिजेत.
  • राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर मराठी माणसाची भावना केंद्र सरकारला कळवावी यासाठी मुख्यमंत्र्यांना आग्रह धरणार असल्याचे केसरकर यांनी म्हटले.

राज्यपालांनी मराठी माणसांची माफी मागावी, अमोल मिटकरींची मागणी!!

महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा.

महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा.@BSKoshyari pic.twitter.com/osCB25qC5a

— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 29, 2022

सुषमा अंधारेंचा राज्यपालांना टोला!!

  • राज्यपाल हे राज्याचे पालक असतात.
  • अन पालकाने राज्याप्रती पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन किंवा आकस बुद्धी न ठेवता ममत्ने राज्याचे संगोपन करणे ही संविधानिक जबाबदारी आहे.
  • परंतु महामहीम कोश्यारीजी यांच्याकडून इतक्याही जास्त अपेक्षा ठेवू नयेत.
  • कारण राज्यापेक्षाही भाजपा सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर अधिक आहे. चला महाराष्ट्र धर्म वाचवण्याची, जपण्याची आणि वाढवण्याची ही मुंबई वाचवण्याची जबाबदारी आपण महाराष्ट्राची भावंडे मिळून घेऊया” असा टोला सुषमा अंधारे यांनी भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे.

Tags: bhagat singh koshyarigujratmumbairajsthanगुजरातीभगत सिंह कोश्यारीमनसेमुंबईराजस्थानीराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना
Previous Post

मिरा भाईंदर महानगरपालिकेत वैद्यकीय विभागात ४ जागांवर करिअर संधी

Next Post

महात्मा फुले, क्रांतिजोती सावित्रीबाईंविषयी बडबडणं, मुंबईतून गुजराती-मारवाडी गेले तर धमकावणं! अशा राज्यपालांचं करायचं काय?

Next Post
महात्मा फुले, क्रांतिजोती सावित्रीबाईंविषयी बडबडणं, मुंबईतून गुजराती-मारवाडी गेले तर धमकावणं! अशा राज्यपालांचं करायचं काय?

महात्मा फुले, क्रांतिजोती सावित्रीबाईंविषयी बडबडणं, मुंबईतून गुजराती-मारवाडी गेले तर धमकावणं! अशा राज्यपालांचं करायचं काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!