Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय लष्करालाही स्वदेशी ‘भाभा कवच’, वजनानं हलकं, पण सुरक्षेत मजबूत!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Bhabha kavach -17-1-22

मुक्तपीठ टीम

भारतीय लष्करालाही लवकरच स्वदेशी बुलेट प्रूफ जॅकेट मिळणार आहे. हे जॅकेट स्वदेशी असलं तरी साधंसुधं नसणार. अनेकदा बुलेटप्रुफ जॅकेट वजनाने खूप जड असतात. जवानांवर आणखी भार वाढतो. पण हे स्वदेश जॅकेट वजनानं हलकं तर सुरक्षेत मात्र मजबूत असं आहे. आपल्या बीएआरसीने हे विकसित केले आहे. भाभा कवच आणि कवच वस्त्र ही दोन बुलेट प्रूफ जॅकेट भारतातच तयार करण्यात येतात.

स्वदेशी ‘भाभा कवच’ तयार झाल्यानंतर त्यांची कडक तपासणीसाठी कठोर चाचण्या झाल्या. सर्व चाचण्यांना सामोरे जात क्षमता सिद्ध केल्यानंतर ते निमलष्करी दलांना पुरवण्यात आले होते. आता त्यांच्या अनुभवांनंतर थेट भारतीय लष्करातील जवानांना पुरवण्यात येणार आहे.

 

भाभा कवच जॅकेटमध्ये कोणत्याही लढ्याला सामोरे जाण्याची क्षमता

  • संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाभा कवच हे भाभा अणु संशोधन केंद्राने विकसित केले आहे.
  • हे ९ किलो वजनाचे आहे पण, अत्याधुनिक पाचव्या पिढीचे बुलेट प्रूफ जॅकेट आहे.
  • हे एके-४७ रायफलमधून उडवलेल्या स्टीलच्या गोळ्यांवरही मात करू शकते.
  • मिश्र धातू निगम आणि आयुध कारखाण्यांनी याला निर्माण केले आहे. निमलष्करी दलात त्याचा वापर सुरू झाला आहे. हे सर्व मानक पूर्ण केले आहे.
  • हे बुलेट प्रूफ जॅकेट लष्कराला आवश्यक असलेल्या सर्व मानकांची पूर्तता करत असल्याचे संरक्षण मंत्रालयाने मान्य केले आहे.
  • मिश्र धातू निगम त्याच्या निर्मितीसाठी रोहतकमध्ये स्वतंत्र युनिट स्थापन करत आहे. याशिवाय, आयुध निर्माणी, कानपूर येथे बुलेट प्रूफ जॅकेट तयार करण्याची क्षमताही विकसित करण्यात आली आहे.

 

कवच वस्त्र जॅकेट आयुध कारखाण्यात विकसित करण्यात आले

देशात उत्पादित केलेले दुसरे बुलेट प्रूफ जॅकेट हे कवच वस्त्र जॅकेट आहे, जे आयुध कारखाना, चेन्नईने विकसित केले आहे. गांधीनगर येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठात याची चाचणी करण्यात आली आहे. हे देखील योग्य असल्याचे आढळून आले आहे. हे जॅकेट साडेतीन ते दहा किलोग्रॅम वजनाच्या पाच आकारात उपलब्ध आहे. हे जवळजवळ भाभा कवचच्या मानकांशी जुळते.

 

स्पर्धेसाठी खासगी कंपन्यांकडेही उत्पादन करण्याचा परवानाही

  • संरक्षण मंत्रालयाने नुकत्याच संसदीय समितीला सादर केलेल्या अहवालात आतापर्यंत २४ हजार भाभा कवच आणि ५ हजार कवच वस्त्र जॅकेट्स तयार करण्याची क्षमता विकसित करण्यात आल्याचे म्हटले आहे. ती वाढवली जात आहे.
  • मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सरकार बुलेट प्रूफ जॅकेट बनवण्यासाठी सरकारी एजन्सींना तसेच खासगी कंपन्यांना परवाने देईल.
  • यामुळे या प्रदेशात स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल आणि लष्कराला बाजारात उपलब्ध असलेली सर्वोत्तम बुलेट प्रूफ जॅकेट खरेदी करण्याचा पर्यायही उपलब्ध होईल.
  • लष्कराला वर्षाला दीड ते दोन लाख बुलेट प्रूफ जॅकेटची गरज असते. तर निमलष्करी दल, पोलीस इत्यादींनाही याची स्वतंत्रपणे गरज असते.

 


Tags: Armor Clothing JacketBhabha KavachBullet Proof Jacketgood newsIndian ArmyMinistry of Defensemuktpeethकवच वस्त्र जॅकेटचांगल्या बातम्याबुलेट प्रूफ जॅकेटभाभा कवचभारतीय लष्करभारतीय सैन्य दलसंरक्षण मंत्रालय
Previous Post

एन. डी. सरांची एक आठवण आणि त्यांच्या बोलण्यातील मिश्किल, भेदक भाष्य

Next Post

मुंबईतील सहा किल्ल्यांचा विकास, जतन आणि संवर्धनासाठी खास प्रयत्न

Next Post
Mumbai Forts

मुंबईतील सहा किल्ल्यांचा विकास, जतन आणि संवर्धनासाठी खास प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!