मुक्तपीठ टीम
अक्षय तृतीयेच्या आधी सोने खरेदी करण्याच्या विचारात असलेल्यांसाठी एक चांगली बातमी आहे. लॉकडाऊनमुळे थेट खरेदी करणे शक्य नसलं तरी तुम्ही सोन्यात गुंतवणूक करु इच्छिता तर त्यासाठी सध्या अनेक डिजिटल पर्याय उपलब्ध आहेत, ज्याद्वारे सोने विकत घेता येऊ शकते. जाणून घेऊयात कोणते आहेत हे डिजिटल पर्याय…
सॉवरिन गोल्ड बाँड
• सॉवरिन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूकदाराला प्रत्यक्षात सोने मिळत नाही.
• पण हे प्रत्यक्षात सोने खरेदी करण्यापेक्षा सुरक्षित मानले जाते.
• या सोन्याच्या शुद्धतेबद्दल बोलायचे झाल्यास हे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात असल्याने त्यावर शंका घेता येऊ शकत नाही.
• या बाँडचा कालावधी ८ वर्ष आहे.
• तसेच रिडेम्पशनबद्दल बोलायचे झाल्यास, पाच वर्षांनंतर कधीही याला कॅश करु शकतो.
• पण ५ वर्षांअगोदर जर गुंतवणूकदारांनी सोने विक्री केल्यास त्याची योग्य किंमत मिळण्याची शक्यता असतेच असे नाही.
• या डिजिटल स्वरुपातील सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी सर्व कमर्शियल बँक, पोस्ट कार्यालये, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा एजेंटच्या माध्यामातून अर्ज प्राप्त करता येते.
डिजिटल गोल्ड
• ई-गोल्ड खरेदी केल्यास कंपन्या आपल्याला घरपोच सोनं पोहचवण्याची सुविधा देते.
• तसेच निश्चित केलेल्या प्रमाणात सोने खात्यात जमा झाल्यानंतर ते सोने घरी मागवू शकतो.
• त्या बदल्यात कंपन्या अतिरिक्त शुल्क आकारतात.
• आपण जे सोने ई-गोल्डद्वारे खरेदी करतात ते सोने कंपन्या आपल्या लॉकरमध्ये ठेवतात, आणि त्यावरही शुल्क आकारले जाते.
• तसेच एका विशिष्ट कालावधीत ई-गोल्ड विकता येते.
एक्सचेंज ट्रेड फंड
जर कोणी गुंतवणूकदाराला एक्सचेंज ट्रेज फंडाद्वारे सोने खरेदी करायची असल्यास, त्यासाठी डिमॅट अकाउंट असणे गरजेचे आहे.