Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संकटातील शाहरुख खान दिवाळीत छोट्या दुकानदारांच्या मदतीला, वोकल फॉर लोकल!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
1
शाहरुख खान

मुक्तपीठ टीम

दिवाळी म्हणजे भारतीयांसाठी सर्वात मोठा सण. उल्हास, जल्लोष आणि दीपोत्सव हे समीकरण ठरलेलेच. या आपल्या आवडत्या उत्सवाची सगळीकडेच जोरात तयारी सुरू झाली आहे. सर्व मोठ-मोठे ब्रँड त्यांच्या उत्पादनांसाठी जाहिरात करत आहेत. कॅडबरी खास प्रसंगी आणि सणांसाठी खास जाहिराती घेऊन येते. या दिवाळीपूर्वीही अभिनेता शाहरुख खानसह कॅडबरीने एक खास जाहिरात केली आहे. सध्या संकटात असलेल्या शाहरुखने आपल्या देशातील संकटात असलेल्या छोट्या व्यापाऱ्यांना साथ देणारी जाहिरात केली आहे. त्यामुळे कॅडबरी आणि शाहरुखच्या या जाहिरातीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

 

कॅडबरी कंपनीने शाहरुखला छोट्या आणि स्थानिक व्यापार्‍यांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घेतले आहे. अभिनेता जाहिरातीत स्थानिक दुकानदारांचे प्रमोशन करीत आहे. या दुकानदारांना कोरोना विषाणूच्या साथीमुळे खूप त्रास सहन करावा लागला आहे. ‘नॉट जस्ट अ कॅडबरी अॅड’ शीर्षक असलेल्या या जाहिरातीची सुरुवात स्थानिक व्यावसायिकांच्या व्हॉईस-ओव्हर्स आणि बाइट्सने झाली. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, कोरोनामुळे किती वाईट परिणाम झाला आहे.

 

व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, या दिवाळीत आम्ही भारतातील सर्वात मोठ्या ब्रँड अॅम्बेसेडरला आमचा ब्रँड अॅम्बेसेडर बनवून अनेक छोट्या व्यवसायांना मदत केली. पुढच्या शॉटमध्ये शाहरुख खान शेरवानी परिधान करताना दिसला. वेगवेगळ्या दुकानांची नावे घेतली. त्यांनी लोकांना त्यांचे कपडे, शूज, मिठाई, गॅझेट इत्यादी खरेदी करण्याचे आवाहन केले. कॅडबरी कंपनीचे म्हणणे आहे की, “जाहिरातीमध्ये शाहरुखचा चेहरा आणि आवाज पुन्हा तयार करण्यासाठी मशीन लर्निंगचा वापर केला गेला आहे.”

 

व्हिडिओच्या शेवटी शाहरुख खान म्हणतो की, “आपल्या आजूबाजूला दुकाने आहेत. त्यांच्यासाठीही दिवाळी गोड असावी.” ही जाहिरात यूट्यूबवर अपलोड झाल्यानंतर व्हायरल झाली. नेटकऱ्यांकडून कॅडबरी आणि शाहरुखच्या या व्हिडीओचे खूप कौतुक करत आहेत.


Tags: bollywood actorscadbury companydiwalilocal businessmenmuktpeethShahrukh Khanकॅडबरी कंपनीदिवाळीमुक्तपीठशाहरुख खान
Previous Post

आज चांगला दिवस! पहिल्या लाटेपासून आजपर्यंतचे सर्वात कमी दैनंदिन रुग्ण! राज्यात ८८९ ! मुंबईत २६३!

Next Post

महाराष्ट्रातील भीमाशंकर, घृणेश्वरसह देशभरातील ज्योतिर्लिंगांना मिळणार उत्तराखंडमधून गंगाजल

Next Post
Gangajal from Uttarakhand

महाराष्ट्रातील भीमाशंकर, घृणेश्वरसह देशभरातील ज्योतिर्लिंगांना मिळणार उत्तराखंडमधून गंगाजल

Comments 1

  1. Anita Bafna says:
    5 years ago

    Great initiative 👏

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!