मुक्तपीठ टीम
ट्युलिपचे गार्डन मग स्वित्झर्लॅंडलाच जावे लागेल…अनेकांना वाटते. पण तसे नाही. आपल्या भारतातही मस्त ट्युलिप गार्डन आहे. यावेळी त्याचा बहर लवकर आला. आणि ते सर्वसामान्यांसाठी खुलेही झाले आहे. ते आहे आपल्या काश्मीरात. या गार्डनमध्ये ६४ प्रकारांची १५ लाखांहूनही अधिक फुले आहेत. ३० हेक्टर क्षेत्रामध्ये पसरलेला ही आशियातील सर्वात मोठी ट्यूलिप बाग आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबद्दल ट्विटही केले आहे. ज्यात त्यांनी असे लिहिले आहे की, २५ मार्चचा दिवस जम्मू-काश्मिरसाठी खूप खास आहे. जबरवान पर्वताच्या पायथ्याशी वसलेले ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले होणार आहे. लोकांना बागेत बहरलेल्या ६४ पेक्षा जास्त प्रकारची १५ लाखांपेक्षा अधिक फुले पहायला मिळणार आहे. त्यांनी ट्युलिपच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी तेथे फिरायला जाण्याचेही आवाहन केले.
गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे ही बाग पर्यटकांसाठी बंद होती. काश्मिर खोऱ्यात फ्लोरीकल्चर आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी हे २००७ मध्ये उघडले गेले.
• श्रीनगर शहरापासून ८ किमी अंतरावर इंदिरा गांधी ट्यूलिप गार्डन आहे.
• दाल सरोवराच्या काठावर जबरवान टेकड्यांच्या शिखरावर इंदिरा गांधी ट्यूलिप गार्डन वसले आहे.
• हे गार्डन अतिशय आकर्षक आणि सुंदर आहे.
• येथे दरवर्षी ७ दिवस ट्यूलिप उत्सव आयोजित केले जातात.
• ज्यामध्ये ७० पेक्षा जास्त जातींची ट्यूलिप फुल दिसतात.
• ही बाग श्रीनगरमधील सर्वात लोकप्रिय बागांपैकी एक आहे.
• ही बाग संपूर्ण ९० एकर क्षेत्रात पसरली आहे.
• फुलांच्या हंगामात या बागेत कमीतकमी १३ लाख ट्यूलिप फुलतात.
• हे गार्डन, शालीमार गार्डन, निशात बाग, चश्म-ए-शाही गार्डन तर त्याचबरोबर इतर मोगल गार्डनही जवळ आहेत.
पाहा व्हिडीओ: