मुक्तपीठ टीम
भारतीय नौदलाच्या बँडचे एकाचजागी खिळवून ठेवणारे सादरीकरण, ‘आयएनएस शिक्रा’ या नौदलाच्या हेलिकॉप्टर तळावरुन ‘चॉपर्स’नी केलेले ‘फ्लाय पास्ट’, नौदलातील सैनिकांनी सादर केलेले ‘कन्टीन्यूटी ड्रिल’ आणि सी कॅडेट कॉर्प्स सेलर्सचे हॉर्नपाईप नृत्य’ आणि एक लहान आॅप डेमो प्रदर्शन या विविध कार्यक्रमांमुळे यंदाचा बिटींग रिट्रीट सोहळा भव्य ‘गेट वे आॅफ इंडिया’च्या पार्श्वभूमीवर रंगला होता.
#NavyDay2021
Join us live at 5:15 pm today #04Dec to #watch the spectacular #BeatingRetreat ceremony.#IndianNavy band, op demo by naval helos, sea cadet corps & continuity drill by men of #KillersSquadron at the iconic #GatewayofIndiahttps://t.co/KRrqsJCloU— SpokespersonNavy (@indiannavy) December 4, 2021
सन १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान भारतीय नौदलाच्या गौरवशाली विजयाच्या स्मरणार्थ ‘नेव्ही डे’ प्रत्येक वर्षी १ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. या ‘उत्सवा’चा एक भाग म्हणून, ‘गेट वे आॅफ इंडिया’ येथे पारंपरिक ‘बीट रिट्रीट अँड टॅटू सोहळा’ आयोजिण्यात आला होता.
गेटवे आॅफ इंडिया येथे झालेल्या सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल •ारतसिंह कोश्यारी हे प्रमुख पाहुणे होते. नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विविध संघटना आणि विविध क्षेत्रातील मान्यवर आणि वरिष्ठ अधिकारी, नौदल कर्मचारी आणि तसेच लष्करी कुटुंबे आणि निमंत्रित दिग्गजांचीही उपस्थिती होती.
बिटींग रिट्रीट सेरेमनी’ ही लष्करी इतिहासाच्या सुरुवातीच्या दिवसांपासूनची परंपरा आहे. जेव्हा दिवसा उजाडल्यावर सैन्याने लढाईपासून दूर जाण्याचा संकेत म्हणून दररोज रिट्रीटचा आवाज दिला जात असे, त्यांना रात्री त्यांच्या छावणीत माघार घेण्याचे आदेश दिले जात असे. दुसरीकडे, टॅटू सेरेमनीमध्ये, सैनिकांच्या बिलेट्समध्ये बँड ड्रम वाजवले जातात आणि त्यांना युद्धभूमीवर दीर्घ दिवसानंतर त्यांच्या क्वार्टरमध्ये जाण्याचे आदेश दिले जात असत.
याप्रसंगी सादर करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण कवायती एकाही शब्दाविना होत्या तसेच त्यांच्या हालचालीदेखील नेत्रदीपक प्रदर्शन होते. सैन्यात कवायती आणि परेडचा उच्च उद्देश म्हणजे चांगले लष्करी संस्कार होणे, अभिमान, आदेशांचे अव्यक्त पालन, उद्देशाची एकता आणि गुण विकसित करणे, असे आहे.
नौदलातील वैमानिकांची (एव्हिएटर्स) घड्याळाची अचूकता पाहून, मरीन कमांडोजच्या धाडसाने गेटवे ऑफ इंडियाच्या भोवती जमलेल्या प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त टाळ्या मिळवल्या. सी कॅडेट कॉर्प्सच्या तरुण कॅडेट्सचा आनंददायी हॉर्नपाइप डान्सदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.