मुक्तपीठ टीम
साहसी टेलिव्हिजन शो मॅन वर्सेस वाईल्डचं सूत्रसंचलन करणाऱ्या बेयर ग्रिल्सने नुकतंच एक मोठं वक्तव्य केलं आहे. शो सुरु झाला तेव्हा सुरुवातीला आपण अनेक जनावरांना मारुन खाल्लं, याचा आपल्याला पश्चाताप होत असल्याचं बेयर गिल्सने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे. तसंच आता आपण जनावरांना मारणार नाही असं सांगत आता फक्त मेलेल्या जनावरांनाच खाणार असल्याचं बेयर गिल्सने स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून इंटू द वाईल्ड विथ बेयर गिल्स या नव्या शोमुळे बेयर गिल्स चर्चेत आहे.
“जनावरांना मारल्याचा आता पश्चाताप”
बिकट परिस्थितीतही तुम्ही कसे जगू शकता, मार्ग काढू शकता हे बेयर गिल्सच्या शोच्या माध्यमातून दाखवलं जातं. बेयर गिल्सने सांगितलं की, भौगोलिक परिस्थितीनुसार उपलब्ध होणाऱ्या जीवसृष्टीच्याआधारे निश्चितपणे आपण शोच्या सुरुवातीला अनेक साप, विंचू, बेडूक आणि इतर जनावरांना मारलं होतं. मात्र आता मला याचा पश्चाताप होत आहे. आता मी यापासून खूप दूर आलो आहे. जर आपण इतिहासातल्या जगण्यासाठी धडपड केलेल्यांचा अभ्यास केला तर ते वनवासी होते.
तुम्ही अन्न पाण्याची व्यवस्था करताना ध़डपड करता, जीव धोक्यात घालता आणि आपली ऊर्जा मोठ्या प्रमाणात खर्ची करत असता.
विगन स्टार्सनी बेयर गिल्सचा विचार बदलला
बेयर ग्रिल्सला शाकाहारी लोकं आणि त्यांच्या शोमध्ये सहभागी होणाऱ्या विगन स्टार्सपासून प्रेरणा मिळाली. ज्यांनी मांसाहाराचं सेवन करण्याप्रती बेयर ग्रिल्सच्या विचारात बदल घडवला. बेयर ग्रिल्सने सांगितलं की, मी अनेक शाकाहारी स्टार्सना जंगलात घेऊन गेलो आहे. हा एक जबरदस्त अनुभव होता आणि मी नेहमीच त्यांचा सन्मान करतो.
बेयर ग्रिल्सच्या शोमध्ये अनेक बॉलिवूड सेलेब्सचाही सहभाग
बेयर ग्रिल्सचा नामांकित शो इंटू द वाईल्ड विथ बेयर ग्रिल्समध्ये अभिनेता विक्की कौशल, अजय देवगण, अक्षय कुमार, रजनीकांत यांच्यासह अनेक भारतीय स्टार्सनी सहभाग घेतला आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामांपासून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही या शोमध्ये सहभागी झाले आहेत.
कोण आहे बेयर ग्रिल्स?
- बेयर ग्रिल्स माजी 21 SAS रिजर्विस्ट राहिलेले आहेत.
- ९०च्या दशकात यूकेच्या स्पेशल फोर्सचा ते भाग होते.
- बेयर ग्रिल्सने ट्रूपर, सर्वाईवल इंस्ट्रक्टर आणि पॅट्रोल मेडिक (आपत्कालीन वैद्यकीय सुविधा) च्या स्वरुपातही काम केलं आहे.
- बेयर ग्रिल्सने संपूर्ण टीव्ही करिअरमध्ये इंटू द वाईल्ड विथ बेयर ग्रिल्स’, मॅन वर्सेज वाईल्ड’, यू वर्सेज वाईल्ड’, द आयर्लँड, एस्केप फ्रॉम हेल, रनिंग वाईल्ड विथ बेयर ग्रिल्स’, बेयर ग्रिल्स सर्वाईवल स्कूल’, एब्सोल्यूट वाईल्ड यासारख्या अनेक शोमध्ये काम केलं आहे.