मुक्तपीठ टीम
आजच्या मॉर्डन आणि डिजिटलायझेशनच्या काळात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणे योग्य नाही. कोणतीही गोष्ट संशयीत वाटल्यास ते टाळणे हेच योग्य आहे. मग, ते खाण्यात असो, फिरण्यात असो किंवा कोणत्या ठिकाणी राहण्यात असो. काही ठिकाणी हॉटेलमधूनही फसवणूक केली जाते. त्यामुळे सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. हॉटेलमध्ये लपवलेले गुप्त कॅमेरे काहीवेळेस दिसत नाहीत, यात खासगी गोष्टी रेकॉर्ड करून याचा फायदा घेत ब्लॅकमेल केले जाते.
नोएडात हॉटेलमध्ये कॅमेरे लपवूण फुटेज लिक करण्याची जोडप्याला धमकी!
- पोलिसांनी नुकतेच नोएडामधील एक प्रकरण उघड केले आहे. . येथे हॉटेलच्या खोलीत एका जोडप्याचे खासगी क्षण रेकॉर्ड केले.
- त्यानंतर त्याचे फुटेज लिक करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन जणांना अटक केली.
- या हॉटेलमध्ये खोल्या बुक केल्यानंतर जोडप्यांचे रेकॉर्डिंग करूणे अशी या आरोपींची पद्धत होती.
- स्वच्छता कर्मचारी लक्ष देत नाहीत, अशा पद्धतीने कॅमेरे बसविण्यात आल्याचे आरोपींनी सांगितले.
हॉटेलमधील गुप्त कॅमेरे कसे शोधायचे?
- लपवलेले कॅमेरे अलार्म घड्याळांच्या स्पीकरमध्ये सहजपणे ठेवता येतात.
- तसेच, लो-हॅंगिंग घड्याळे आढळल्यास, फ्लॅशलाइटने ती काळजीपूर्वक तपासा. त्यांना टिश्यू पेपरने झाकणे ही सर्वात सोपी गोष्ट आहे.
- खोलीतील प्रत्येक वस्तू नेहमी तपासा जसं की, फॅन्सी लाइट, रीडिंग लॅम्प, फोटो फ्रेम किंवा इतर कोणतीही गोष्ट.
- तुम्हाला काही संशय आल्यास कर्मचार्यांना फोन करून तपासा.
- हॉटेलच्या खोलीत टीव्ही आणि सेट-टॉप-बॉक्स तपासण्यास कधीही विसरू नका. फ्लॅशलाइटसह तपासणे चांगले आहे, जेणेकरून आपण लपविलेल्या कॅमेराचा प्रकाश पाहू शकता.
- फुलदाणीही पाहायला विसरू नका, काळजीपूर्वक सर्व फुले काढून टाका आणि तपासा.
आरशात लपवलेले कॅमेरे तपासायला विसरू नका
- खोलीतील आरसे, कपाट आणि वॉशरूम तपासण्यास कधीही विसरू नका.
- टू-वे मिरर टेस्ट येथे सर्वोत्तम आणि सर्वात विश्वासार्ह आहे.
- टॉर्चने वेंटिलेशनही व्यवस्थित तपासा.
- उदाहरणार्थ- तुमचे नख आरश्या समोर आणल्यास नख आणि त्यांच्या प्रतिमेत काही अंतर असेल तर तो नॉर्मल आरसा आहे. जर नख त्याच्या प्रतिमेला स्पर्श करत असेल तर तो टू-वे मिरर असू शकतो.