मुक्तपीठ टीम
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाच्या आकड्यात घट होताना दिसत होती. मात्र, अचानक रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसातच संक्रमित रुग्ण वाढीचा वेग ५ पटीवर गेला आहे. ११ फेब्रुवारी रोजी राज्यात ६५२ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. हा आकडा १३ फेब्रुवारीला ३६७० आणि १४ फेब्रुवारीला ४०९२ झाला. तर रविवारी ४० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रातील रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झालेल्या आकडेवारीचा परिणाम देशातील रुग्णांच्या आकडेवारीवरही झाला आहे. रविवारी, देशात ११ हजार ४३१ नवीन रुग्ण आढळले तर ९ हजार २६७ रुग्ण बरे झाल्याची नोंद आहे. यावरुन असे लक्षात येते की, सलग तिसऱ्या दिवशी नव्याने संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या बरे होणाऱ्या रुग्ण संख्येपेक्षा अधिक आहे.
आतापर्यंत देशात १.०९ कोटी लोक कोरोना संक्रमित आहेत. यातील १.०६ कोटी लोक बरे झाले आहेत. तर १.५५ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
मुख्य राज्यांची कोरोना स्थिती
दिल्ली
राजधानी दिल्लीत रविवारी १५० नव्या संक्रमित रुग्णांची नोंद झाली. १५८ लोक बरे झाले आणि दोन जणांनी जीव गमावला.
सध्या येथे १०३१ संक्रमित रूग्ण उपचार घेत आहेत.
मध्यप्रदेश
रविवारी राज्यात कोरोनाची लागण झालेल्या २२३ लोकांना आढळले. २०५ लोक बरे झाले आणि ५ जणांचा मृत्यू पावले आहेत.
सध्या येथे १,८४२ संक्रमित रूग्ण उपचार घेत आहेत.
गुजरात
रविवारी राज्यात २४७ लोकांना कोरोनाची लागण झाली. २७० लोक बरे झाले आणि एकाचा मृत्यू झालं आहे.
सध्या १७३९ संक्रमित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.