Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘बार्टी’त नागरी सेवा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

September 30, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
barti

मुक्तपीठ टीम

नागरी सेवा परीक्षेत अनुसूचित जातीचा टक्का वाढावा म्हणून बार्टी, येरवडा येथे यूपीएससी निवासी प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरु करणार असल्याचे तसेच यूपीएससी २०२० मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली.

 

पुणे येथील बार्टी च्या सभागृहामध्ये बार्टीच्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२० मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

 

उपायुक्त पुणे मुकुल कुलकर्णी (IRS), व उपायुक्त रुपेश शेवाळे (IRS) हे उपस्थित होते. यु पी एस सी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी शरण कांबळे (AIR 542)व अजिंक्य विद्यागर (AIR 617)यांचा सत्कार बार्टीचे महासंचालक गजभिये यांच्याहस्ते करण्यात आला.

 

महासंचालक धम्मज्योती गजभिये म्हणाले, कठीण परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी कष्टाची पराकाष्ठा करून मेहनत घेतली, यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२० यश मिळविले, या यशानंतर तुमच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला जगातील सर्वोत्तम संविधान दिले. या संविधानाची अंमलबजावणी करून महामानवाचा विचार पुढे न्यावे, असे गजभिये यांनी सांगितले.

 

मुलाखतीच्या पूर्वतयारी प्रशिक्षणामध्ये वरिष्ठ केंद्रीय सनदी अधिकाऱ्यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे तीन मॉक इंटरव्ह्यु घेण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्याद्वारे एकमेकांची मुलाखत घेतली व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पॅनलद्वारे मुलाखत घेण्यात आली. १० मे २०२१ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आयुक्त, प्रशांत नारनवरे यांच्या ऑनलाईन मार्गदर्शनपर व्याख्यानातून पूर्वतयारी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. मुकुल कुलकर्णी व रुपेश शेवाळे यांनी प्रशिक्षणाची रूपरेषा तयार केली होती. या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत उमेदवारांनी बार्टी संस्थेचे आभार मानले, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

 

सुहास गाडे, स्वप्नील निसर्गन, पियुष मडके हे यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी सत्कार सोहळ्यात ऑनलाइन उपस्थित राहिले. IRS रुपेश शेवाळे, व IRS मुकुंद कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. या सत्कार सोहळ्यास बार्टीतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रिया पवार, प्रकल्प अधिकारी यांनी केले. उमेश सोनवणे, विभाग प्रमुख, योजना विभाग, बार्टी, यांनी आभार मानले .

 


Tags: bartiDhananjay Mundepuneधनंजय मुंडेपुणे बार्टी
Previous Post

“मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय”

Next Post

शिर्डी विमानतळाच्या सभोवताली सर्व सुविधायुक्त शहर वसवणार! 

Next Post
Shirdi 2

शिर्डी विमानतळाच्या सभोवताली सर्व सुविधायुक्त शहर वसवणार! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!