Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अनवाणी धावत रेवती ऑलिम्पिकमध्ये पोहोचली…पदक जिंकणार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
gnm (21)

मुक्तपीठ टीम

टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतासाठी धावणारी एक स्पर्धक रेवती वीरमणी म्हणजे एक धावतं आश्चर्य आहे. रेवतीला तिचे प्रशिक्षक के. कनन यांनी अनवाणी धावताना पाहिलं. तिचा वाऱ्याचा वेग त्यांना भावला. त्यांनी तिला जोखलं. तिला निवडलं. त्यांच्या तालमीत तयार झालेली रेवती आता टोकियो ऑलिम्पिकसाठी निवडली गेली आहे. रेवती भारताच्या ४x४०० मिक्स्ड रिले संघात आहे. तिला आणि प्रशिक्षकांना ती देशासाठी पदक जिंकणारच, असा आत्मविश्वास आहे.

अवघ्या २३ वर्षांच्या रेवतीचे आयुष्य सुरुवातीच्या टप्प्यात खूप आव्हानात्मक होते. आई वडिलांचे निधन झाले तेव्हा तिचे वय सात वर्षही नव्हते. तिला तिची आजी अर्णमल यांनी वाढवले. त्या रोजंदारी मजूर होत्या. रेवतीला धावणे खूप आवडायचं. पण धावण्यासाठी बुटांची जोडी खरेदी करणे देखील तिला शक्य नव्हते.

gnm1 (2)

रेवती तिच्या किशोरवयातपर्यंत अनवाणी चालत असे. तामिळनाडूच्या क्रीडा विकास प्राधिकरण मदुराई सेंटरचे प्रशिक्षक के. कनन यांनी तिला पाहिले. २०१४-१५ मध्ये रेवती एमजीआर रेसकोर्स स्टेडियमवर धावताना दिसली. ती जिंकू शकली नाही. पण प्रशिक्षकांनी वयाच्या १७ व्या वर्षी रेवती मधील अनवाणी चालण्याचे कौशल्य ओळखले. त्यांचे प्रयत्न, रेवतीची प्रतिभा आणि परिश्रम यामुले ती ऑलिम्पिकमध्ये पोहचली. तिला पदक जिंकण्यासाठी मुक्तपीठच्या खूप खूप शुभेच्छा.

रेवती अनवाणी धावली आणि प्रशिक्षकांना भावली…

कनन आजही रेवतीची आठवण सांगतात, “मी एक तरुण मुलगी अनवाणी चालताना पाहिले. मी तिच्यामुळे खूप प्रभावित झालो. ती कोठे राहते हे शोधून भेटायला गेलो. सुरुवातीला रेवतीच्या आजीने प्रशिक्षण देण्यास नकार दिला. त्यांना वाटले की, हे खूप महाग असेल. ते एका गरीब कुटुंबातून येतात त्यामुळे फूल टाइम खेळण्यास ते घाबरतात.”

रेवती म्हणाली, “माझ्या घरातून प्रशिक्षण केंद्राकडे जाण्यासाठी रोजचे ४० रुपये भाडे मला परवडत नाही. पण कनन सर ठाम राहिले.”

gnm1 (1)

कनन सरांचे प्रयत्न फळास आले…

  • कनन यांच्या बर्‍याच प्रयत्नांमुळे शेवटी चांगला परिणाम झाला.
  • शेवटी रेवतीची आजी तयार झाली.
  • त्यांनी रेवतीला धावण्याचे मोफत प्रशिक्षण दिले.
  • एवढेच नाही तर तिला मदुराईच्या लेडी डॉक महाविद्यालयातही विनामूल्य प्रवेश मिळवून दिला.

बूट घालून धावणे हेच रेवतीपुढचे पहिले आव्हान!

  • बूट घालून धावणे हे रेवतीसाठी सर्वात मोठे आव्हान होते.
  • कनन सर रेवतीसाठी बूट घेऊन आले असले तरी तिला अनवाणी चालण्यास सोपे वाटत होते.
  • ती खूप प्रयत्नपूर्वक बूट घालून धावण्यास शिकली.

रेवती धावू लागली…जिंकूही लागली!

  • सन २०१६ मध्ये रेवतीच्या आयुष्यात मोठा बदल झाला.
  • यावर्षी कोयंबटूरमध्ये तिने १०० मीटर, २०० मीटर आणि ४x१०० मीटर रिलेमध्ये जुनिअर नॅशनलमध्ये सुवर्णपदक जिंकले.
  • कनन यांनी रेवतीला वर्ष २०१९ पर्यंत प्रशिक्षण दिले. ४. त्यानंतर ती पटियाला येथे शिफ्ट झाली. येथे ती राष्ट्रीय शिबिराचा एक भाग होती.
  • तिच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला १०० मी आणि २०० मीटर स्पर्धांमध्ये भाग घेत असली तरी, ४०० मीटर कार्यक्रमात तिने भाग घ्यायला सुरुवात केली.
  • सन २०१९ मध्ये रेवतीने ४०० मीटर स्पर्धेत इंडियन ग्रँड प्रिक्स ५ आणि ६ जिंकले.
  • आता रेवती दक्षिण रेल्वेच्या सेवेत मदुराई येथे तिकीट तपासणीस आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Revathi VeeramaniTokyo Olympicsके. कननक्रीडा विकास प्राधिकरण मदुराई सेंटरटोकियो ऑलिम्पिकरेवती वीरमणी
Previous Post

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाने जारी होणार १० लाख डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे

Next Post

वारकऱ्यांच्या सेवेसी डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे फाऊंडेशनची अत्याधुनिक रुग्णवाहिका

Next Post
gnm (22)

वारकऱ्यांच्या सेवेसी डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे फाऊंडेशनची अत्याधुनिक रुग्णवाहिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!