मुक्तपीठ टीम
बँका आता मोबाइलमध्ये आल्यात, अनेक कामे तेथे सहजच होतात. अनेक बँक खातेदार असेही असतात की जे वर्षातून एखाद्यावेळीच बँकेच्या शाखेत जात असतील. तरीही बँकिंगची अनेक कामे अशी असतात किंवा अनेक खातेदार असे असतात, ज्यांना बँकेत जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळेच त्यांच्यासाठी ही एक महत्वाची बातमी. एप्रिलच्या एका महिन्यात देशात बँका चौदा दिवस म्हणजे जवळपास अर्धा महिना बंद असणार आहेत.
आता सर्वच जण ऑनलाईन बँकिंग किंवा डिजिटल बँकिंग व्यवहाराचा पर्याय निवडतात. बँकेच्या मोबइल अॅप, यूपीआय, नेटबँकिंग किंवा थर्ट पार्टी अॅपमधून काही सेकंदातच आता पैसे ट्रान्सफर करता येतात. यासुविधांमुळे बँकिंग व्यवहार खूपच सोयीस्कर झाले आहेत. पण असे असले तरी, कर्जाशी संबंधित कोणतेही कामे, चेक जमा करायचा असेल, पासबुक अपडेट करायचे असल्यास बँक शाखेत जाण्याची आवश्यकता असते. जर एप्रिलमध्ये तुम्ही बँकेची काही कामं करायचा विचार करत असाल तर या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. नाही तर नाहक त्रास सहन करावा लागेल.
एप्रिलमध्ये देशातील वेगवेगळ्या झोनमध्ये बँकांचे कामकाज एकूण १४ दिवस बंद असणार आहे. या १४ दिवसांत चार रविवार आणि दोन शनिवारचाही समावेश आहे.
पाहा सुट्ट्यांच्या तारखा
- १ एप्रिल – मुंबई , आगरतळा, अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, कोलकात्ता, जम्मू, लखनऊ, नवी दिल्ली, चेन्नई आणि डेहराडून
- २ एप्रिल- मुंबई, एंजल, बेलापूर, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चेन्नई, देहरादून, गंगटोक, हैदराबाद, इम्फाळ, कानपूर, कोची, कोलकाता, लखनऊ, नागपूर, नवी दिल्ली, पणजी, पाटणा, रायपूर, रांची, शिलॉंग आणि तिरुअनंतपुरम
- ४ एप्रिल- रविवार
- ५ एप्रिल- सोमवार-हैदराबाद
- १० एप्रिल- दूसरा शनिवार
- ११ एप्रिल- रविवार
- १३ एप्रिल- मुंबई, नागपूर, उगादडी, , बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इम्फाळ, पणजी आणि श्रीनगर
- १४ एप्रिल- मुंबई, नागपूर, अगरताला, अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, देहरादून, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इम्फाळ, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, कोलकात्ता, लखनऊ, पणजी, पटना, रांची, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरम
- १५ एप्रिल- अगरतला, गुवाहाटी, कोलकात्ता, रांची आणि शिमला
- १६ एप्रिल- गुवाहाटी
- १८ एप्रिल- रविवार
- २१ एप्रिल- मुंबई, नागपूर, अगरतला, अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, देहरादून, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनऊ, पटना, रांची आणि शिमला
- २४ एप्रिल- चौथा शनिवार
- २५ एप्रिल- रविवार