मुक्तपीठ टीम
बँकांच्या खासगीकरणासह इतर सरकारी निर्णयांच्या निषेधार्थ विविध कर्मचारी संघटना आजपासून दोन दिवसीय संपावर जात आहेत, त्यामुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. बँक युनियनने पुकारलेल्या संपामुळे २८ मार्च आणि २९ मार्च रोजी बँकांमधील कामकाज बंद राहणार असल्याचे एसबीआयकडून सांगण्यात आले आहे. बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या काळात ग्राहकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. तसेच एप्रिलमध्ये सुट्ट्यांमुळे १५ दिवस बँका बंद राहणार आहेत.
या दोन दिवसीय संपाची घोषणा ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनसारख्या संघटनांनी केली आहे. बँकशी संबंधीत तुमचे काही महत्त्वाचे काम असल्यास त्याचे आधीच नियोजन करा, कारण एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात ९ दिवस सुट्टी असणार आहे. सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे-
एप्रिलमध्ये बँक १५ दिवस बंद राहणार…
- १ एप्रिलला बँक खात्यांची वार्षिक क्लोजिंग(आयझॉल, चंदीगड, शिलाँग, शिमला वगळता सर्वत्र बँका बंद राहणार) कोणतेही काम होणार नाही.
- एप्रिल – बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इंफाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी आणि श्रीनगरमध्ये गुढीपाडवा, उगादी, नवरात्रीचा पहिला दिवस, तेलुगु नववर्ष, साजिबू नोंगमपांबा सण यामुळे या दिवशी बँका बंद राहतील.
- रविवार ३ एप्रिल साप्ताहिक सुट्टी आहे.
- ९ एप्रिल हा महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँक बंद राहणार आहे.
- १० एप्रिल रोजी रविवार येत आहे तेव्हा साप्ताहिक सुट्टी आहे.
- -१४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती/ महावीर जयंती/ बैसाखी/ वैशाखी/ तामिळ नववर्ष दिन/ चेराओबा/ बिजू उत्सव/ बोहाग बिहू (शिलाँग आणि शिमला वगळता सर्वत्र बँका बंद)
- गुड फ्रायडे/बंगाली नववर्ष दिन (नबावर्षा)/हिमाचल दिवस/विशू/बोहाग बिहू १५ एप्रिल रोजी (जयपूर, जम्मू, श्रीनगर वगळता सर्वत्र बँका बंद)
- -१७ एप्रिल रविवारी साप्ताहिक सुट्टी असतो.
- २३ एप्रिलला महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँक बंद राहणार आहे.
- रविवार २४ एप्रिल साप्ताहिक सुट्टी आहे.
आरबीआयने सुट्ट्यांची यादी जाहीर केली
- बँकिंग सुट्ट्यांची यादी भारतीय रिझर्व्ह बँक जारी करते.
- आरबीआय वर्षाच्या सुरुवातीला बँकिंग सुट्ट्यांची यादी बनवते आणि ती जारी करण्याचे काम करते.
- यामध्ये राज्यानुसार सुट्ट्यांचा समावेश आहे.