मुक्तपीठ टीम
वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर हा आला. या महिन्यात हवेत सुखद गारवा असल्याने नोकरदारांनाच नाही तर सर्वांनाच सुट्ट्यांवर भटकंतीची आठवण येते. अनेकदा त्यातून दुर्लक्ष होते ते बँकांच्या व्यवहाराकडे. त्यामुळेच डिसेंबरमध्ये किती दिवस बँका बंद असणार ते तपासणे आवश्यक आहे. नाहीतर ऐनवेळी अडचण होऊ शकते. या महिन्यात देशाच्या वेगवेगळ्या भागात ११ दिवसांसाठी बँका बंद राहणार आहेत. आपल्या भागात तेवढ्या जास्त सुट्टया नसतील. अर्थात सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये बँकेचे ऑनलाईन व्यवहार चालू असतीलच.
डिसेंबरमधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी
३ डिसेंबर
- सेंट फ्रान्सिस झेवियर्स सणानिमित्त सुट्टी आहे.
- फक्त पणजीमध्ये बँका बंद असतील.
५ डिसेंबर
या दिवशी साप्ताहिक सुट्टी आहे.
११ आणि १२ डिसेंबर
अनुक्रमे दुसरा शनिवार आणि रविवार असल्याने बँका बंद राहतील.
१९ डिसेंबर
या दिवशी रविवार आहे.
२५ डिसेंबर
देशातील बहुतांश राज्यांमध्ये ख्रिसमसमुळे बँका बंद असतील.
२६ डिसेंबर
या दिवशी रविवार आहे.