Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मंत्री संजय राठोड गेले शिंदे गटात, बंजारा समाजाचे महंत मात्र शिवसेनेसोबत!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
sanjay Rathod

मुक्तपीठ टीम

बंडखोर शिंदे गटातील मंत्री आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नेहमी पाठीशी उभा राहणारा बंजारा समाज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. पोहरादेवी गडाचे तीन मंहत व पन्नास ते साठ टक्के बंजारा समाजाचे प्रतिनिधी मातोश्रीवर जाउन शिवबंधन हातावर बांधणार आहेत. हे सर्व उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत शिवसेनेचा भगवा हातात घेणार आहेत, अशी माहिती पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी दिली आहे.

संजय राठोड यांना मोठा धक्का!!

  • वेळोवेळी संजय राठोडांची पाठराखण करणाऱ्यापैकी तीन महंत शिवबंधन बांधणार आहेत.
  • त्यांच्या सोबत समाजातील अनेक नेते आणि पन्नास ते साठ टक्के बंजारा बांधवांचे प्रतिनिधीही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
  • या माहितीला सुनील महाराज यांनी दुजोरा दिला आहे.
  • येत्या तीन दिवसात बंजारा समाजाचे लोक मातोश्रीवर जाउन शिवबंधन हातावर बांधणार आहेत.
  • हे सर्व उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधणार आहेत.
  • बंजारा समाजातून महत्वाच्या व्यक्तींनी शिवसेनेत प्रवेश केल्यास संजय राठोड यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
  • यामुळे संजय राठोड यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे.

संजय राठोड, बंजारा समाज आणि शिवसेना!

  • पोहरादेवी हे बंजारा समाजाचे सर्वात मोठे शक्तीपीठ आहे.
  • या गडाच्या महंतांचा आदेश बंजारा बांधव शिरसावंद्य मानतात.
  • संजय राठोड यांनी शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली.
  • वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी ते १९९७मध्ये यवतमाळ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झाले होते.
  • विशेष म्हणजे संजय राठोड यांनी २००४ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला.
  • २००९ मध्ये त्यांनी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांचा पराभव केला.
  • यानंतर शिवसेना पक्षात त्यांचे महत्त्व वाढले.
  • मंत्री संजय राठोड यांना उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर भाजपाच्या आक्रमकतेमुळे पद सोडावे लागले.
  • पण एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत भाजपाच्या सोबत सरकार स्थापन केले. भाजपाचे फडणवीस आणि शिंदे गटाच्या मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळाल्यानंतर राठोडांनी याच पोहरादेवी येथे मोठं शक्ती प्रदर्शन केलं.
  • याच गडाच्या महंतांनी संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे दबाव आणून मागणी केली होती.
  • उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी पोहरादेवी दर्शनाला येण्याची घोषणा केली होती, त्याला समाजातून चांगला प्रतिसाद मिळाला.
  • आता त्याआधीच महंतांच्या आणि बंजारा समाजातील प्रमुख मान्यवरांच्या शिवसेनेकडे जाण्याची बातमी आल्याने राठोडांना मोठा धक्का आहे.

Tags: Banjara Communitysanjay rathodShinde GroupShivsenaUddhav Thackerayउद्धव ठाकरेबंजारा समाजशिंदे गटशिवसेनासंजय राठोडसुनील महाजन
Previous Post

सर्वांना सोबत घेवून बंतारा समाजाने व्यावसायिक प्रगती केली- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

ज्ञानलक्षी, प्रवासवर्णनपर साहित्याला वाचकांची मोठी मागणी

Next Post
ज्ञानलक्षी, प्रवासवर्णनपर साहित्याला वाचकांची मोठी मागणी

ज्ञानलक्षी, प्रवासवर्णनपर साहित्याला वाचकांची मोठी मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!